Home | Maharashtra | Mumbai | foot over bridge near Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT railway station collapses Mumbai

ऑफिसमधून घरी निघाले होते लोक, अचानक 35 फूट उंचीवरून कोळसला पादचारी पुलाचा स्लॅब, सर्वत्र उडाला हाहाकार, समोर आला दुखद Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 12:46 PM IST

अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, भक्ती शिंदे, जाहिद शिराज खान, तपेंद्र सिंह, माेहन कायगुंडे अशी मृतांची नावे आहेत.

 • foot over bridge near Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT railway station collapses Mumbai

  मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांंचा मृत्यू झाला असून 34 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, भक्ती शिंदे, जाहिद शिराज खान, तपेंद्र सिंह, माेहन कायगुंडे अशी मृतांची नावे आहेत.

  हिमालय ब्रीज असे या पादचारी पुलाचे नाव आहे. लोक त्याला ‘कसाब ब्रीज’ असेही म्हणतात. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना सायन, सेंट जॉर्ज, जीटी, कामा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहेत. पूल 100 वर्षे जुना होता. तो धोकादायक होता. त्यासंदर्भात आपण पालिकेला पत्र दिले होते. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवक सुजाता सानप यांनी केला आहे.

  मृतांच्या परिवाराला 5 लाख तर जखमींना 50 हजार
  मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये दिले जातील, जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, तसेच जखमींवर पूर्ण उपचार केले जातील. पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  या दुर्घटनेत 34 नागरीक जखमी झाले आहेत. त्यातील सेंट जॉर्ज मध्ये 15 तर जीटी रुग्णालयात 15 जखमींना दाखल करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने हा पूल बांधला होता. देखभालीचे काम मुंबई महापालिकेकडे होते. पुलाचे ऑडीट झाले होते. सल्लागार कंपनीने पुलाची किरकोळ दुरुस्ती सुचवली होती. त्याच्या निविदा या आठवड्यात पालिकेच्या स्थायीमध्ये मंजुरीला येणार होत्या, अशी माहिती स्थानिक खासदार व शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली.

  सीएसटीच्या पश्चिम बाजूने म्हणजे भायखळ्याच्या बाजूने बाहेर पडल्यावर रस्ता ओलांडावा लागू नये यासाठी हा पूल बांधला गेला. सीएसटी ते टाईम्स ऑफ इंडीया यांना हा पूल जोडला गेला आहे.

  पूल 100 टक्के धोकादायक नव्हता. दुरुस्ती होईपर्यंत तो बंद ठेवायला पाहिजे होता. जखमींना सर्व वैद्यकीय मदत शासन करेल. पालिका व रेल्वे या दुर्घटनेची एकत्रित चौकशी करतील, अशी घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.

  मिळालेली माहिती अशी की, सीएसटीएमकडून कामा हॉस्पिटलच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा हा पादचारी पूल आहे. पुलाचा स्लॅब गुरुवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास कोसळला. पुलाखाली दोन गाड्या दबल्या गेल्या आहेत. सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतर या पुलावर मोठी गर्दी होत असते. चाकरमाने सीएसटी स्टेशनकडे जाण्यासाठी याचा पुलाचा वापर करतात. पुलाच्या शेजारी टाईम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग आहे. तसेच महत्त्वाची ऑफिसेस या भागात आहे.

  घटनास्थळी भायखळाचे एमआयएमचे आमदार अॅड. वारीस पठाण हे पोहोचले आहे. या घटनेनुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारी आणि विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मेट्रोचे कामही या भागात सुरू आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. दुर्घटनेची भीषणता दाखवणारे फोटो...

 • foot over bridge near Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT railway station collapses Mumbai
 • foot over bridge near Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT railway station collapses Mumbai
 • foot over bridge near Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT railway station collapses Mumbai
 • foot over bridge near Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT railway station collapses Mumbai

Trending