Home | Maharashtra | Mumbai | cst footover bridge collapse family reaction

अपघात नव्हे सहा जणांचा खूनच, उद्विग्न नातलगांंच्या भावना, दु:खावेग, हुंदके अन् संताप

संताेष काळे | Update - Mar 16, 2019, 10:48 AM IST

सीएसटी पूल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झालेला नसून ताे खूनच आहे. पुलाचे स्ट्रॅक्चरल आॅडिट झाल्याचे सांगितले जात आहे

 • cst footover bridge collapse family reaction

  मुंबई - एखादा माणूस एकदा चूक करताे तेव्हा त्याला माफ केले जाते. परंतु मुंबर्इत या चुका वारंवार घडत असून त्याला माफी कशी द्यायची. सीएसटी पूल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झालेला नसून ताे खूनच आहे. पुलाचे स्ट्रॅक्चरल आॅडिट झाल्याचे सांगितले जात आहे. हे आॅडिट नेमके काय केले, हे मी खाेदून काढणार. पुढे काय हाेर्इल ते माहिती नाही पण मी माझ्या बहीणीसाठी काही तरी करू शकलाे असे समाधान तरी मिळेल... सीएसटीच्या पूल दुर्घटनेत मृत्युमूखी पडलेल्या जीटी रुग्णालयातील परिचारिका रंजना तांबे यांचे धाकटे बंधू धर्मेंद्र तांबे यांच्या डाेळ्यातील अश्रू थांबत नव्हते. प्रत्येक हुंदक्यातून संताप व्यक्त हाेत हाेता.


  जीटी रुग्णालयात रात्रपाळीसाठी जात असलेल्या अपूर्वा प्रभू, रंजना तांबे अणि भक्ती शिंदे या परिचारिकांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या डाेंबिवलीतील साेसायटीत शाेककळा पसरली हाेती. भक्ती यांच्या घरी काेणीही बाेलण्याच्या परिस्थितीत नव्हते.


  बातमीत पहिला फोटो बहिणीचाच दिसला
  धर्मेंद्र तांबे घरी आल्यावर त्यांनी टीव्ही लावला. दुर्घटनेची बातमी सुरू हाेती, त्यात बहिणीचाच फाेटाे दिसला आणि माेठा धक्का बसला. ही बातमी कळल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून त्यांच्या घरी सांत्वन करणाऱ्यांची गदी झाली हाेती.


  आरटीआय टाकणार
  चाैकशीसाठी समिती स्थापन हाेते, निष्कर्ष काढले जातात पण पुढे काहीच हाेत नाही. या मानसिकतेचे परिणाम माझी बहिण आणि मैत्रिणींना भाेगावे लागले. लेखापरिक्षणाच्या चाैकशीसाठी मी आरटीआय टाकणार असल्याचे धर्मेंद्र तांबे म्हणाले.


  संबंधितांना बडतर्फ करा
  या पुलाचे गेल्या एक दाेन वर्षांत ज्यांनी लेखा परिक्षण केले त्याला बडतर्फ केले पाहिजे. इतकेच नाही तर या अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांनाही जबाबदार ठरवले पहिजे. कारण हा अपघात नाही तर सहा जणांचा खून आहे, असा संताप तांबेंनी व्यक्त केला.


  चूक कुणाची, प्राण कुणाचे गेले
  अपूर्वा यांचा मृत्यू झाल्याची बातमी पती अभय प्रभूंना आॅफिसमधून निघाल्यानंतर आलेल्या फाेनमुळे कळली. या दांपत्याला गणेश (७), चिन्मयी (११) अशी दाेन मुले आहेत. अभय यांनी डबडबलेल्या डाेळ्यांनीच दरवाजा किलकिला करून ‘माफ करा’, असे साांगितले. चूक काेणाची आणि प्राण काेणाचे गेले, एवढेच ते बाेलू शकले.

Trending