Home | Maharashtra | Mumbai | cst footover bridge collapse issue bmc

पूल दुर्घटना : मुंबई पालिकेचे मुख्य, सहायक अभियंता निलंबित; स्ट्रक्चरल ऑडिटरवरही ठपका

विशेष प्रतिनिधी | Update - Mar 16, 2019, 09:26 AM IST

या दुर्घटनेची जबाबदारी कुणाची याबाबत २४ तासांत अहवाल द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना

  • cst footover bridge collapse issue bmc

    मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल कोसळून गुरुवारी झालेली दुर्घटना चुकीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमुळेच घडल्याचे समोर आले आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांना मुख्य अभियंत्यांनी (चौकशी) प्राथमिक अहवाल सादर केला असून यात पालिकेचे पाच अधिकारी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपनीवर ठपका ठेवण्यात आला आहे. यानुसार आयुक्तांनी दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनासह तिघांची खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते यांना निलंबित करण्यात आले अाहे, तर मुख्य अभियंता (निवृत्त) एस. ओ. कोरी, उपमुख्य अभियंता आर. बी. तरे (निवृत्त) आणि मुख्य अभियंता ए. आय. इंजिनिअर यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाईल.


    गुरुवारी या दुर्घटनेत सहा जणांचा बळी गेला, तर ३१ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी कुणाची याबाबत २४ तासांत अहवाल द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना दिले होते.


    स्ट्रक्चरल ऑडिटरची हकालपट्टी
    हिमालय पादचारी पूल दुर्घटनेची २४ तासांच्या आत चौकशी करून पालिका अधिकारी, ठेकेदार, स्ट्रक्चरल ऑडिटर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, तर हा पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणारे स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाईची शासकीय पॅनलवरून हकालपट्टी करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Trending