Home | Maharashtra | Mumbai | cst footover bridge gt hospital nurses news in marathi

आमच्या मैत्रिणींवर काळाचा घाला, श्रद्धांजली सभेत मृत नर्सच्या आठवणींना उजाळा

प्रतिनिधी | Update - Mar 16, 2019, 10:46 AM IST

मुंबईतील सीएसटीसमाेरील पूल दुर्घटनेत तीन नर्स मृत्युमुखी पडल्या. त्यापैकी अपूर्वा प्रभू, रंजना तांबे या जीटी रुग्णालयात

  • cst footover bridge gt hospital nurses news in marathi

    मुंबई - ‘स्वभावाने मनमिळाऊ, कामात प्रामाणिक असणाऱ्या आमच्या रुग्णालयातील नर्स अचानक कायमच्या दूर जातील असे आम्हाला स्वप्नातही कधी वाटले नव्हते. त्यांचे कुटुंब निराधार झाले आहे,’ अशा भावना जीटी रुग्णालयातील परिचारिकांनी व सहकर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. गुरुवारी मुंबईतील सीएसटीसमाेरील पूल दुर्घटनेत तीन नर्स मृत्युमुखी पडल्या. त्यापैकी अपूर्वा प्रभू, रंजना तांबे या जीटी रुग्णालयात कार्यरत हाेत्या, तर भक्ती शिंदे सेंट जाॅर्ज रुग्णालयात नाेकरीस हाेत्या. या तिघींनाही जीटी रुग्णालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.


    ‘भक्ती यांचे कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून होते. त्यांचे दोन्ही भाऊ या जगात नसल्याने त्यांच्या मुलांची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. भक्ती यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरपला. रुग्णालयातील प्रत्येक कार्यक्रमात आवडीने सहभागी होणाऱ्या या दाेघी हाैशी नर्स आमच्यापासून काळाने हिरावून नेल्या आहेत,’ अशा भावना त्यांच्या सहकर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.


    जीटी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितले, ‘पूल दुर्घटनेनंतर १४ जखमी जीटी रुग्णालयात दाखल झाले होते. यापैकी दाेघांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याशिवाय एका जखमीला न्यूरोसर्जरीसाठी जे.जे.मध्ये पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता एकूण १० जखमी जीटीमध्ये दाखल असून त्यांना हाडे आणि स्पायनल इंज्युरी आहेत. या जखमींवर सकाळपासून शस्त्रक्रिया सुरू आहेत. याशिवाय त्यांच्यासाठी रुग्णालयाच्या ब्लड बँकेतील रक्तसाठा वापरण्यात आला.’

Trending