Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | cumin and jaggery water for periods problem

जिरे-गुळाचे पाणी दूर करू शकते पीरियड्समधील समस्या

हेल्थ डेस्क | Update - Aug 08, 2018, 02:56 PM IST

पीरियड्सच्या समस्या टाळण्यासाठी गुळाच्या पाण्यात जिरे टाकून पिणे फायदेशीर आहे. जिरे आणि गूळ या दोन्हींमध्ये असे न्यूट्रि

 • cumin and jaggery water for periods problem

  पीरियड्सच्या समस्या टाळण्यासाठी गुळाच्या पाण्यात जिरे टाकून पिणे फायदेशीर आहे. जिरे आणि गूळ या दोन्हींमध्ये असे न्यूट्रियंट्स असतात, जे पीरियड्सच्या काळातील तक्रारी दूर करतात. या दोन्ही पदार्थांचे ड्रिंक शरीरासाठी फायदेशीर कसे याबाबत आम्ही माहिती देणार आहोत..


  गरजेचे काय? : एक चमचा गूळ, अर्धा चमचा जिरे
  काय करावे? : एका भांड्यात दोन कप पाणी टाका. यामध्ये एक चमचा गूळ आणि अर्धा चमचा जिरे मिसळा. हे पाणी उकळा आणि कोमट करून प्या.


  किती वेळा प्यावे? : नाष्ट्यानंतर रोज दिवसातून एक वेळा प्यावे.
  फायदेशीर का? : जिऱ्यामध्ये आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे पीरियड्स नॉर्मल राहतात. गुळामधील अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे पीरियड्समध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. यामुळे पीरियड्स नियमित होतात.


  काय टाळावे? : या दिवसांत जास्त गोड पदार्थ किंवा फास्ट फूड टाळावे. यामुळे पीरियड्सची समस्या वाढू शकते.
  अजून काय करावे? : रोज प्राणायाम करा. धनुरासनासारखे योग करा. यामुळे हार्मोन्सची पातळी योग्य राहते. पीरियड्सच्या तक्रारी दूर होतात.


  कसे राहावे सावध? : पीरियड्समध्ये आपला आहार समतोल ठेवा. पालक आणि केळीसारखे पदार्थ पीरियड्सची समस्या टाळतात.
  लक्षात ठेवा : जर दीर्घकाळ पीरियड्सची समस्या राहत असेल तर डॉक्टरांशी अवश्य संपर्क साधावा.

Trending