आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Curative Petition Filed By Pawan, Hearing In Supreme Court Today, Nirbhaya Rape And Murder News Updates

दोषींचा नवा पवित्रा; पवनने दाखल केली क्युरेटिव्ह याचिका, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी पवनने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली

नवी दिल्ली- निर्भया हत्याकांडातील दोषी पवन गुप्ताने डेथ वॉरंटची मुदत संपायला दोन दिवस असताना रविवारी नवा पवित्रा घेतला. त्याचे वकील ए. पी. सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. हे प्रकरण फाशीशी संबंधित असल्याने यावर खुल्या कोर्टात सुनावणी करावी, अशी मागणी केली. 

शुक्रवारी पवनने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. घटनापीठासमोर सोमवारी सकाळी ही सुनावणी होत आहे. या वेळी नव्या याचिकेवर सुनावणी केली जाईल. शनिवारी चारपैकी दोन दोषींनी दिल्ली न्यायालयात ३ मार्च रोजी डेथ वॉरंटवर अंमलबजावणी करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, गृह मंत्रालयाच्या वतीने दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाने ५ मार्च ही तारीख दिली. दुसरीकडे, निर्भयाच्या आईने दोषींना फाशी देण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल पुन्हा एकदा तीव्र दु:ख व्यक्त केले. 
 

बातम्या आणखी आहेत...