आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, आता स्वस्तात करता येईल इलेक्ट्रिक वाहनाची खरेदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : केंद्र सरकारने सामान्य नागरिकांपर्यंत इलेक्ट्रिक व्हीकल सहजरित्या आणि कमी दरात पोहचावे यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे इलेक्ट्रिक व्हीकल खरेदी करण्याने स्वस्त होणार आहे. केंद्रांतर्गत येणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अॅण्ड कस्टमने बुधवारी एक अधिसूचना जारी केली. यामध्ये इलेक्ट्रिक व्हीकल आणि त्याचे पार्ट्सच्या आयातीवर लागणारी कस्टम ड्युटी कमी केली आहे. 


बॉक्स पॅक मोबाइल होणार महाग

(CBIC)ने इलेक्ट्रिक व्हीकल आणि त्याच्या पार्ट्सवरील ड्युटी 10 ते 15 टक्क्यांनी कमी केली आहे. याआधी हा चार्ज 15 ते 30 टक्के होता. बॅटरीपॅख इलेक्ट्रिक व्हीकलवरील आयात शुल्क 5 टक्के करण्यात आले आहे. तर बॅटरीपॅक मोबाइल फोनवरील शुल्क दुप्पट करून 20 टक्के करण्यात आले आहे.

 

कसे आणि किती लागणार आयात शुल्क

CBICने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार इलेक्ट्रिक व्हीकलचे पार्ट जसे की, बॅटरीपॅक, मोटर, ब्रेक सिस्ट आणि इतर पार्ट्सवर 10 टक्के आयात शुल्क लावणार आहे. पण यामध्ये व्हीकलच्या चेचिसचा समावेश करण्यात आला नाही. दुसरीकडे प्री-असेंबल पॅकवर 5 टक्के दर असणार आहे. 

 

इलेक्ट्रिक व्हीकलला मिळणार प्रोत्साहन

कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे स्थानिक पातळीवरील इलेक्ट्रिक व्हीकलला प्रोत्साहन मिळणार आहे. सोबतच देशातील वाढत्या प्रदुषणावर आळा बसण्यास मदत होईल. CBIC सांगितले की, कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे Make in India मोहिमेला सुद्धा प्रोत्साहन मिळत असल्याचे CBIC  सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...