आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Custom Hearing Center Farm Machinery Scheme Useful If You Want To Earn Money Using New Technology Equipment In The Farm

शेतीत नव्या तंत्रज्ञानाच्या उपकरणाचा वापर करून पैसा कमावण्याची इच्छा असेल तर कस्टम हायरिंग सेंटर फार्म मशिनरी स्कीम उपयोगी

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • शेतकरी गट बनवून १० लाखांचा प्रकल्प सुरू करू शकता, ८ लाख सबसिडी
  • शेतकरी मोबाइल अॅपवर ऑर्डर देऊन ट्रॅक्टर, कृषी अवजारे मागवू शकतात

नवी दिल्ली - तुम्ही शेतकरी असाल आणि मशीनद्वारे शेती करून पैसा कमावू इच्छित असाल तर केंद्र सरकारच्या कस्टम हायरिंग सेंटर(सीएचसी) फार्म मशिनरी योजनेचा लाभ उचलू शकता. या योजनेअंतर्गत केंद्र उघडल्यानंतर ६० लाख रुपयांपर्यंतचा प्रोजेक्ट मंजूर करून घेऊ शकता. म्हणजे, परिसरातील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तेवढ्या रकमेची कृषी अवजारे खरेदी करू शकता. प्रकल्पात २४ लाख रुपये सरकार गंुतवेल. पाच-सहा शेतकरी सहकारी गट स्थापूनही मशीन बँक तयार करू शकतात. गटासाठी जास्तीत जास्त १० लाख रुपयांचा प्रोजेक्ट मंजूर होईल. यामध्ये तुम्हाला ८ लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकेल. म्हणजे, तुम्हाला केवळ २०% रक्कम गुंतवावी लागेल. देशात शेतकरी सीएचसी फार्म मशीनरी मोबाइल अॅपवर ऑर्डर देऊन ट्रॅक्टर व अन्य कृषी उपकरणे स्वस्त दरात किरायावर मागू शकतील. केंद्र सरकार शेती फायद्यात व शेतकऱ्यांसाठी सुलभ बनवण्याच्या प्रयत्नात आहे.२०१४-१९ मध्ये १०.७५ लाख उपकरणे दिली


कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी म्हणाले, मशिनरीचा वापर शेतकऱ्यास सशक्त बनवेल. कृषी यांत्रिकीकरणावर उप-मिशनअंतर्गत हा आकडा २०१४ ते २०१९ दरम्यान शेतकऱ्यांना स्वस्त दरावर १०,७५,१९४ मशीन्स दिल्या आहेत.देशात ८,४६६ सीएसी आणि ६,८४१ फार्म मशीन बँक
शेतीच्या अवजारांची उपलब्धता वाढवण्यासाठी देशात ८,४६६ सीएचसी व ६,८४१ फार्म मशीन बँक तयार केल्या. येथून शेतकरी सरकारद्वारे निर्धारित दरांवर ओला-उबेरप्रमाणे मोबाइलच्या माध्यमातून अवजारे भाड्याने घेऊ शकतील.या पावलामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता


मोबाइल अॅपद्वारे  मागू शकता अवजारे, ३ फायदे हाेतील :
> शेती करणे सोपे होईल
> ट्रॅक्टर, मशिनरीसारखी महागड्या उपकरणांची खरेदीची गरज नाही.
> कमी दरावर मिळाल्यामुळे शेतीतील उत्पन्नही वाढेल.बातम्या आणखी आहेत...