आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विमानतळावर स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाच्या टॉयलेटमधून 4 किलो सोने जप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी मोठी कारवाई केली आहे. दुबईहून आलेल्या स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाच्या टॉयलेटमधून सुमारे 4 किलो सोने (एक किलोचे 4 बार)  जप्त करण्‍यात आले आहे. जप्त करण्यात आलेले सोने तस्करी करुन आणल्याचे आढळून आले. या सोन्याची किंमत 1 कोटी 29 लाख 4 हजार रुपये आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, दुबईहून निघालेले स्पाईस जेट फ्लाईट एस जी 52 हे गुरुवारी (ता.10) पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी पुणे विमानतळावर आले. पुण्याहून ते बंगलुरुला जाते.  कस्टम अधिकारी तपासणी करीत असताना विमानातील टॉयलेटमध्ये काळ्या टेपमध्ये गुंडाळून ठेवलेले हे चार सोन्याचे बार आढळून आले. त्यावर परदेशी मार्क आहे. पथकाने हे सोने  जप्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...