या आघाडीच्या कंपनीचा स्मार्टफोन वापरल्यानंतर काही दिवसांतच त्याचा स्क्रीन तुटायला लागल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी

दिव्य मराठी

Apr 19,2019 11:10:00 AM IST

लंडन - दक्षिण काेरियातील आघाडीच्य सॅमसंग कंपनीने अलिकडेच दुमडणारा स्माटफाेन बाजारात दाखल केला. या स्मार्टफाेनची २६ एप्रिलपासून विक्री सुरू हाेणार आहे. व्यावसायिक विक्रीसाठी बाजारात येण्याअगाेदर कंपनीने आढावा घेण्यासाठी हा स्मार्टफाेन प्रसारमाध्यमे आणि तांत्रिक विशेषज्ञांकडे पाठवलाे हाेता. या आढाव्यामध्ये अनेकांनी या स्मार्टफाेनच्या भक्कमतेवर प्रश्न उपस्थित केले आहे. स्मार्टफाेन वापरल्यानंतर काही दिवसातच त्याचा स्क्रिन तुटायला लागल्याचे कंपनीला सांगण्यात आले. या स्मार्टफाेनची किमत १९८० डाॅलर (जवळपास १.३७ लाख रुपये) आहे. तांत्रिक विशेषज्ञ मार्क गार्मेन यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे जाे गॅलक्सी फाेल्ड पाठवण्यात आला ताे वापरल्यानंतर दाेन दिवसातच त्याची स्क्रिन पूर्णपणे तुटली आहे. परिणामी हा स्मार्टफाेन काम करू शकत नाही. माझ्या स्मार्टफाेनच्या बाबतीत जे झाले ते अन्य काेणाच्या बाबतीत झाले की नाही हे माहिती नाही. तर ब्लूमबर्गने आपल्या माेबाईल आढाव्यात फाेनच्या स्क्रिनमध्ये अनेक अडचणी असून पहिल्यांदा उजव्या बाजुच्या स्क्रिनने काम करणे बंद केले. त्यानंतर डाव्या डिस्प्लेमध्ये अडचणी आल्या. शेवटी माेबाइलने पूर्णपणे काम करणे बंद केले आहे. ब्लूमबर्गप्रमाणे अन्य विशेषज्ञांनी देखील याच प्रकारे आपल्या आढाव्यामध्ये लिहीले आहे. सीएनबीसीचे तंत्रज्ञान संपादक काेवाशाेब्ड यांच्या म्हणण्यानुसार स्मार्टफाेनचा उजवा आणि डाव्या बाजुचा डिस्प्ले नीट काम करीत नसून एक दिवस वापरल्यानंतरच या अडचणी सुरू झाल्या आहेत. द व्हर्जचे डायटर बाेन आणी लाेकप्रिय युट्यूब रिव्ह्युअर मार्कस ब्राऊनली यांनी देखील गॅलक्सी फाेल्डच्या स्क्रिनच्या समस्या नाेंदवल्या आहेत. या स्मार्टफाेनच्या डिस्प्लेवर असलेली सुुरक्षात्मक प्लॅस्टीक फिल्म काढताना माेबाईलची स्क्रिन तुटत असल्याचे प्रकारही समाेर आले आहे. परंतु कंपनीने स्मार्टफाेन वापराच्या माहिती पुस्तकात सुरक्षात्मक प्लॅस्टिक फिल्मला काढण्याची गरज नाही असे म्हटले आहे. वास्तविक या संदर्भात अनेक सावध इशारा देखील देण‌्यात आला आहे. काही प्रकरणात ही फिल्म न काढताही डिस्प्ले तूटत आहे.

तांत्रिक विश्लेषक आनंद श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार हा स्मार्टफाेन व्यावसायिक विक्रीला आणण्याअगाेदर समसंगला स्क्रिनची त्रुटी दूर करावी लागेल. ग्राहकांच्या हातात हा स्मार्टफाेन गेल्यानंतर ही समस्या कायम राहीली तर कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकताे. गॅलक्सी नाेट ७ बाबतीत असे झाले हाेते. या फाेेनच्या बॅटरीला आग लागत हाेती. त्यानंतर सॅमसंगने हे स्मार्टफाेन बाजारातून माघारी बाेलावले हाेते.

कंपनीचा दावा, स्मार्टफाेनला दाेन लाख वेळा दुमडने शक्य
सॅमसंगने काही दिवसांअगाेदरच गॅलक्सी फाेल्डचा एक चाचणी अहवाल प्रसिध्द केला हाेता. त्यामध्ये राेबाेटच्या मदतीने या स्मार्टफाेनला अनेकवेळा दुमडून, न दुमडून चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कंपनीचा असाा दावा आहे की या स्मार्टफाेनला दाेन लाखवेळा ‘फाेल्ड- अनफाेल्ड’ करता येऊ शकते.

X