आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Customers Had Reaction After Tattoo Removing Process

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅड पाहून टॅटू मिटवण्यासाठी गेले अनेकजण, पण नंतर त्वचेचे झाले असे हाल, फोडांमध्ये झाला पस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या काही लोकांना फेसबूकवर टॅटू रिमुव्हलची अॅड पाहून टॅटू मिटवणे महागात पडले आहे. या अॅडमध्ये अदृश्य शाईच्या माध्यमातून टॅटू हटवता येणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर अनेक लोकांनी त्याठिकाणी जाऊन टॅटू मिटवून घेतला होता. पण ते त्यांना चांगलेच महागात पडले आहे. याच लोकांनी आता त्यांचा वाईट अनुभव सोशल मीडियावर काही फोटोंसह शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितले की, टॅटू हटवल्यानंतर त्यांच्या शरिरावर याचा काय वाईट परिणाम झाला. तसेच त्यांना त्याचा किती त्रास सहन करावा लागला.