आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'क्योरा'वर सायबर हल्ला; 10 कोटी युजर्सला फटका, संस्थेच्या सीईओंनी साेमवारी ब्लाॅगमधून दिली चोरीबद्दल माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेच्या कॅलिफाेर्नियातील युजर्सच्या प्रश्नांची उत्तरे देणारी साेशल साइट 'क्याेरा'वर सायबर हल्ला झाला अाहे. हल्ला करणाऱ्या हॅकर्सनी या संकेतस्थळावरील सुमारे १० काेटी युजर्सच्या अकाउंटमधून त्यांचे नाव, ई-मेल, इन्क्रिप्टेड पासवर्डसह इम्पाेर्ट केलेला डेटा चाेरला अाहे. या खळबळजनक प्रकाराची माहिती डेटा चाेरी गेलेल्या युजर्सना क्याेरातर्फे ई-मेल पाठवून दिली जात अाहे. 

 

क्याेराचे सीईअाे अॅडम डी'अंॅजेलाे यांनी साेमवारी रात्री उशिरा एका ब्लाॅगमधून ही माहिती दिली. कुठल्या तरी थर्ड पार्टीने चुकीच्या पद्धतीने अामच्या सिस्टिमपर्यंत पाेहाेचून युजर्सचा डेटा चाेरला अाहे. कंपनीला या सायबर हल्ल्याबाबत गत ३० नाेव्हेंबरला कळले हाेते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात अाला. या हल्ल्याचा गुप्त रीतीने लिहिलेले प्रश्न व त्यांच्या उत्तरावर मात्र काेणताही परिणाम झालेला नाही. कारण गाेपनीय पद्धतीने मजकूर, व्हिडिअाे अादी पाेस्ट करणाऱ्यांची अाेळख अामची संस्था साठवून ठेवत नाही, असे अंॅजेलाे यांनी त्यांच्या ब्लाॅगमध्ये म्हटले अाहे. 

 

टीमने केले काम सुरू 
या प्रकरणावर क्याेराच्या अंतर्गत सिक्युरिटी टीमकडून काम सुरू असून, अाम्ही कायदा प्रवर्तन संस्थेच्या अधिकाऱ्यांनाही या हल्ल्याची माहिती दिली अाहे. याशिवाय डेटा चाेरी झालेल्यांचे अधिक नुकसान हाेऊ नये म्हणून कंपनीतर्फे त्यांचे अकाउंट लाॅगअाऊट केले जात अाहे 

 

पासवर्ड बदला 

डेटा चाेरला जाऊ नये म्हणून पासवर्ड बदलण्यासह युजर्स त्यांचे अकाउंट डिलीटही करू शकतात. मात्र, असे हाेण्यास १४ दिवस लागतात. त्यामुळे युजर्सनी काळजी घ्यावी. कारण या काळात पुन्हा लाॅगइन केल्यास अकाउंट अॅक्टिव्हेट हाेते, असा सल्लाही कंपनीतर्फे दिला जात अाहे. 

बातम्या आणखी आहेत...