आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर बुलिंग स्पष्टवक्त्या महिलांसाठी शाप!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा लेख लिहिण्याच्या काही तासांपूर्वी मी स्वत: सायबर बुलिंग व ट्रोलिंगची शिकार झाले. ट्विटरवर शाहिद कपूरच्या कबीर सिंह या चित्रपटावर मी पोस्ट केली होती. त्यामुळे काही लोक नाराज होते. परिणामी माझ्या ट्विटर टाइमलाइनवर अश्लील शिव्या देण्यात आल्या. ‘कबीर सिंह’वरील प्रतिक्रियेत मी लिहिले होते की, हा चित्रपट बाॅक्स अाॅफिसवर चालतोय म्हणजे प्रेक्षकांना महिलांचा द्वेष करणाऱ्या कथा आवडतात व ते असे चित्रपट स्वीकारत आहेत. आॅनलाइन शिव्या देणाऱ्यांशी मी भांडण्याएेवजी माझ्या स्वभावानुसार काही काळ विचार केला. नंतर मी त्यांची नावे आणि डिटेल्स सायबर सेलला पाठवून त्यांना ब्लाॅक केले. स्त्रीद्वेषाचे समर्थक मानणाऱ्या सर्वांनाच ब्लाॅक केले. सायबर बुलिंग हा डिजिटल युगात आपले विचार मांडण्यास सज्ज झालेल्या महिलांसाठी एक शाप आहे. सार्वजनिक चर्चांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढतोय, पण त्यांच्याविरोधात सायबर स्पेसमध्ये विष पसरवून त्यांना इंटरनेटपासून दूर ठेवण्याचे काम केले जात आहे. काही महिला अपशब्द वापरणाऱ्यांशी भिडतात, त्यांना प्रत्युत्तर देतात. पण बहुतांश महिला शांत होऊन सायबर जगापासून दूर होतात. त्यामुळे डिजिटलायझेशनच्या फायद्यांची फळे महिलांच्या वाट्याला कमीच येतात. महिलांना अाॅनलाइन अपशब्द वापरणाऱ्या, बुलिंग करणाऱ्यांची मन:स्थिती नेमकी कशी असते? कायद्याच्या कक्षा व नियम ओलांडण्याची हिंमत केल्यास सायबर बुलिंग होते. पण सध्या अनेकदा पीडितांची खासगी माहिती टाकून त्यांच्यावर शारीरिक हल्ले व बलात्काराच्या धमक्याही दिल्या जातात.


कोणत्याही महिलेला आॅनलाइन बुलिंग करणे हे थेट बुलिंगपेक्षा जास्त धोकादायक ठरू शकते. कारण तिला रोखण्यासाठी या पद्धतीने वारंवार धमकावले जाते. या गुन्हेगारांचा शोध घेणे हे कायद्याच्या रक्षकांसाठी खूप आव्हानात्मक व कठीण असते. कारण बहुतांश गुन्हेगार स्वत:चे नाव जाहीर करत नाहीत किंवा खोट्या नावाने आॅनलाइन जगात स्वत:चे काम फत्ते करत असतात. अशा प्रकरणांमध्ये पीडित व्यक्ती भावनिकरीत्या एवढी खचते की, ती या आघातातून पुन्हा उभी राहूच शकत नाही. या अवस्थेत पीडित पोस्ट ट्राॅमेटिक डिसआॅर्डरग्रस्त होतात, असे काही अभ्यासाअंती आढळून आले. गेल्या वर्षी ट्रोल झालेल्या काही लोकांनी आत्महत्या केली होती. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अशी ट्रोलिंग करणारे स्वत:च्या आयुष्यात आनंदी नसतात. यातील काही बेकार असतात तर काही व्यसनाधीन असतात. इंटरनेटवर ओळख न सांगता अस्तित्व दाखवण्याचे साहस त्यांच्यात येते. समाजात त्यांचे योगदान हे केवळ धोकादायक अाॅनलाइन वर्तणूक असून त्याद्वारे महिलांचा आॅनलाइन सहभाग कमी करण्याचा हेतू असतो. त्यामुळेच आपण हे प्रकार अधिक गांभीर्य व तत्परतेने पाहायला हवेत. कारण याचे परिणाम देशाच्या आरोग्यावर होत आहेत. २०१८ पर्यंत आपल्याकडे अशा प्रकारांचा डेटाबेस नव्हता. २०१८ मध्ये नॅशनल क्राइम रेकाॅर्ड॰स ब्युरो एनसीआरबीने खोटे आॅनलाइन प्रोफाइल, अाॅनलाइन असभ्य वर्तणूक, फसवणूक, सायबर स्टाॅकिंग, बुलिंग किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे याचा डेटा नोंद केला जाईल. या डेटाद्वारे आपल्याला गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात येईल. याआधारे पोलिसांना पुढील धोरण आखता येईल. सायबर बुलिंगचे प्रकार केवळ पोलिसांमार्फत रोखता येणार नाहीत. यात सामाजिक जबाबदाऱ्यांचीही तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे. कारण सायबर बुलिंगमध्ये काही काळ सलग हल्ले केले जातात. त्यामुळे पीडितेने धाडसाने पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे. सामान्यत: पीडित व्यक्ती पोलिसांपर्यंत जाण्याची हिंमत करत नाहीत. अनेकदा कुटुंबातील व्यक्तीच सामाजिक दडपणापायी तिला पुढे जाऊ देत नाहीत. हे साफ चुकीचे आहे. आॅनलाइन वर्तणुकीबाबत भारतात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. यासाठी शालेय जीवनापासूनच पार्श्वभूमी तयार करता येईल. शिक्षक व पालकांनी मुलांना जबाबदार आॅनलाइन व्यवहार शिकवले पाहिजेत. किशोरवयीनांच्या इंटरनेट वापरावर पालकांचे नियंत्रण हवे. अनेकदा मुलांच्या अशा वर्तणुकीनंतर पालकांना मुलांच्या सवयी कळू लागतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या वागणुकीतील बदलावर लक्ष ठेवले पाहिजे.


भारतात अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कायदे आहेत. फक्त ते जनजागृतीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. जेणेकरून पीडित व्यक्ती अाॅनलाइन हल्ल्यांविरुद्ध तक्रार करू शकेल. बहुतांश डिजिटल प्लॅटफाॅर्मवर सायबर बुलिंगविरोधात तक्रार करण्याची सुविधा दिलेली असते. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, गुगल किंवा इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफाॅर्मवर तक्रार करण्याच्या पद्धतीही सोप्या आहेत. ऑनलाइन चर्चांमध्ये सभ्यता बाळगणे ही आजची गरज आहे. फक्त यासाठी सामाजिक इच्छाशक्तीची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...