आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक दिवसांपासून टेंशनमध्ये होती सासु की तिचे खसगी बोलणे इंजीनिअर जावयाला कसकाय कळत आहे, एके दिवशी मुलाने चेक केला मोबाइल तेव्हा समोर आले हे शॉकिंग सत्य...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर (हरियाणा)- सलोनी मेहता टेंशनमध्ये होत्या की, मुलगी सुनैना किंवा परिवारातील कोणत्याही सदस्ययासोबत मोबाइलवर झालेले बोलने जावई सन्नी शर्माला गुड़गांवमध्ये बसून कसकाय कळत होते. मुलाने चेक केला मोबाइल तर परिवारासमोर आले जावयाचे शॉकिंग सत्य. चेक केल्यावर कळाले की, मोबाइलमध्ये आरएमसी अॅंड्रॉयड सेल रेकॉर्डर सॉफ्टवेयर इंस्टॉल होते. आता त्यांनी सॉफ्टवेयर इंजीनिअर सन्नी शर्मावर फर्कपुर पोलिस ठाण्यात आईटी अॅक्टच्या अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. विशेष बाब म्हणजे ही तक्रार त्यांच्या पहील्या अॅनिव्हर्सरिच्या ठीक आधी दाखल केली आहे. 25 नोव्हेंबर 2017 ला सन्नी शर्माचे लग्न सुनैना सोबत झाले होते. सन्नी गुड़गांवमध्ये जेएमडी मेगापॉलिसी कंपनीत सीनियर डेव्हलपमेंट इंजीनियर आहे. तर सुनैना गुड़गांवच्या एका कंपनीत एग्जिक्यूटिव्ह आहे. त्या दोघात भांडण सुरू आहेत आणि सहा महिन्यांची गरोदर सुनैना दोन महिन्यांपासून माहेरी गेलेली आहे.

 

माझी ई-मेल आयडी बदलली, मोबाइलचा बॅकअप चोरला

सलोनी यांनी सांगितले की, सुनैना-सन्नीच्या लग्नात लायकीपेक्षा जास्त हूंडा दिला होता. तरीदेखील सन्नी आणि त्याचा परिवार सुरूवातीपासूनच सुनैनाला त्रास देत होते. काही दिवसांपुर्वी सुनैनाने पोलिसांत तक्रार दाखल केली पण नंतर त्यांनी आपसातच मिटवून घेतले. पण तरीही तिला त्रास देणे थांबले नाही त्यामुळे 9 ऑक्टोबरला परत तक्रार दाखल केली. मला संशय होता की माझ्या घरच्यांशी झालेले बोलने सन्नीला कळायचे. मी माझ्या मुलाला मोबाइल चेक करायला सांगितले तेव्हा कळाले की, माझा ई-मेल आयडी सलोनी मेहता बदलून सुनैना मेहता केला आहे. माझा मोबाइल नंबर काढून सन्नीने त्याचा नंबर टाकला आहे. त्यामुळे माझे सगळे संभाषण सन्नीच्या लॅपटॉपमध्ये रेकॉर्ड व्हायचे.

 

बॅकअप घेतल्याच्या आरोपाचे केले खंडन 
सन्नीने मोबाइलमध्ये रिकॉर्डर इंस्टॉल करून डाटा बॅकअप घेतल्याचा आरोपाचे खंडन केले आहे. पहिले सासरच्या लोकांनी माझ्या विरुद्ध 22 जूनला हूंडा मागितल्याची खोटी तक्रार दाखल केली, नंतर आरोप लावला की  मी सुनैनाला तिचे दागिने देत नाहीये. आता मोबाइलमध्ये रिकॉर्डर इंस्टॉल करने आणि ई-मेल आयडी बदलल्याचा खोटा आरोप लावला आहे. माझ्या जवळ देखील पुरावे आहेत जे मी वेळ आल्यावर सादर करेलच. माझी सॅलेरी 1 लाखांपेक्षा जास्त आहे, मी असली कामे करत नाही.

बातम्या आणखी आहेत...