आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे स्थापन केले जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तंत्रज्ञानाच्या वापरासह वाढलेल्या सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ते हाताळून गुन्ह्यांचा तपास करणारे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्या अनुषंगाने अाता जळगावात लवकरच स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे उभारले जाणार आहे. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदेंनी याचा पाठपुरावा सुरू केला आहे. 

 

सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आवश्यक सुविधा व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा खर्च राज्य शासनाकडून केला जाणार आहे. 'टेक्नोसॅव्ही' पोलिस कर्मचाऱ्यांना या नवीन विभागात काम करण्याची संधी दिली जाणार आहे. माहिती व तंत्रज्ञान कायद्यात नमूद केल्याप्रमाणे पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी या गुन्ह्यांचा तपास करू शकतो. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...