आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गज’ वादळाने घेतले तामिळनाडूत 23 बळी; ताशी120 किमी वेग,82 हजार लोकांना हलवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> १२ हजार वीज खांब, शेकडो वृक्ष उन्मळून पडले राज्यातील १० जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित
 

चेन्नई- गज वादळाने शुक्रवारी तामिळनाडूत प्रचंड नुकसान झाले. ताशी १२० किमी वेगाने हे वादळ पुढे सरकत असून यामुळे नागापट्टनम, तंजावर, तिरुवारूर, 

पुडुकोट्टाई, रामनाथपुरम आणि कुड्डालोर जिल्ह्यांतून हे वादळ पुढे सरकले आहे. तामिळनाडू, पुड्डुचेरी, केरळ आणि कर्नाटकातील अनेक भागांत या वादळामुळे मुसळधार पाऊस पडला. वादळ आणि पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत आतापर्यंत २३ लोकांचा मृत्यू झाला.
दरम्यान, वादळाचा प्रकोप पाहता ८२ हजार लोकांना ४७१ मदत छावण्यांत हलवण्यात आले असून वादळाने आतापर्यंत सुमारे १२ हजार वीज खांब आणि शेकडो वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक विद्यापीठांनी शुक्रवारपासून सुरू होणा ऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

 

शिवाय राज्यातील अनेक भागांत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
तामिळनाडूत एनडीआरएफच्या नऊ आणि पुड्डुचेरीमध्ये दोन पथके तैनात करण्यात आली असून सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. इतर जखमींना प्रत्येकी २५ हजारांची मदत दिली जाणार आहे.

 

गृहमंत्र्यांनी घेतला अाढावा...
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ. के. पलानीसामी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील बचावकार्याबद्दल समाधान व्यक्त करून राज्याच्या आपत्ती निवारण यंत्रणेच्या कार्याचा गौरव केला.

 

 

बातम्या आणखी आहेत...