आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला चक्रीवादळाचा तडाखा : ९ हजार लोक बेघर, बचावकार्याला वेग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेनयांग - ईशान्य चीनच्या लायोनिंग प्रांताला बुधवारी चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळात सहा जणांचा मृत्यू झाला असून १९० लोक जखमी झाले आहेत. वादळामुळे ९ हजारांवर लोक बेघर झाले आहेत. सायंकाळी पंधरा मिनिटांत वादळाने दाणादाण उडवली. तडखा बसलेल्या भागात मदतकार्य सुरुवात झाली आहे. अग्निशमन, आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर ८०० हून जास्त कर्मचारी नागरिकांच्या मदतीला धावले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. 
 

वादळात ४३०० घरांची पडझड
चक्रीवादळात ४ हजार ३०० घरांची पडझड झाली आहे तर १०० हेक्टरहून जास्त शेतावरील पीक नष्ट झाले आहे. वादळानंतर पडझड झालेल्या इमारतीतून किमान २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश मिळाले आहे.