Home | Maharashtra | Mumbai | Cyclonic Storm Vayu impact on South West & Mumbai Monsoon; Know About Monsoon 2019 Current Status Updates

वायुमुळे मानसूनची गती मंदावली, पाहावी लागणार आणखी 7 दिवसांची वाट, मागच्या वर्षी 3 दिवस आधीच आला होता मानसून

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 14, 2019, 04:25 PM IST

मागील 24 तासात मुंबईतील सांता क्रूजमध्ये 0.3 मिमी आणि कोलाबामध्ये 6.0 मिमी प्री-मानसून पावसाची नोंद

 • Cyclonic Storm Vayu impact on South West & Mumbai Monsoon; Know About Monsoon 2019 Current Status Updates

  मुंबई- वायु चक्रीवादळ ओमानकडे वळले आहे, पण त्यामुळे दक्षिण-पश्चिम मानसूनच्या गतीवर त्याचा परिणाम पडला आहे. हवामना विभागाने सांगितले की, मानसूनला मुंबईत येण्यासाठी आणखी एक आठवड्याचा वेळ लागणार आहे. पण, मागील 24 तासात मुंबईमध्ये प्री-मानसून पाऊस पडला आहे. हा पाऊस शनिवारीही सुरू राहील असा अंदाज वर्तवला जात आहे. यावेळेस केरळमध्ये मानसून एक आठवडे उशीराने 8 जूनला आला होता. मुंबईमध्ये 10 जूनपर्यंत पोहचणारा मानसून आधीच एक आठवडा उशीरान येत आहे, आता हा 24 ते 25 जूनपर्यंत मुंबईत दाखल होईल.


  हवामान खात्याने सांगितल्यानुसार, गुरुवारी मुंबईच्या सांताक्रूज परिसरात 0.3 मिमी प्री-मानसून पावसाची नोंद झाली आहे. तर कोलाबामध्ये 6.0 मिमी पाऊस पडला आहे. यामुळे शहरातील ताकमानही कमी झाले आहे. मानसून येईपर्यंत असाच रिमझीम पाऊस पडत राहणार आहे. स्कायमेटने सांगितल्यानुसार, दक्षिण-दक्षिणपश्चिमी परिसरात पुढील 24 तासात 40 ते 50 किमी प्रती तासांच्या वेगाने वारे वाहू शकतात. यावेळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.


  वायुमुळे आतापर्यंत 174 ट्रेन आणि 400 विमान रद्द
  मुंबईमध्ये उच्च ज्वारामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगितले जात आहे की, 20 फुट उंच लाटा येऊ शकतात. यामुळे 400 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शुक्रवारी पश्चिम रेल्वेने 46 ट्रेनही रद्द केल्या आहेत. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 174 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याचे संचालक जयंत सरकार यांनी सांगितले की, आता चक्रिवादळ पोरबंदरच्या परिसरातून गेले आहे, पण त्याचा परिणाम 15 दिवस गुरजारमध्ये राहणार आहे. गुजरातमध्ये 24 तासांसाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

  प्री-मानसून सीजनमध्येही कमी पाऊस
  स्कायमेटचे वैज्ञानिक समर चौधरी यांनी सांगितले की, यावेळी अल नीनो आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानसूनचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. 65 वर्षांतील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा प्री-मानसून जवळ-जवळ कोरडा गेला. यावेळी सामान्यतः 131.5 मिलीमीटर पाऊस वडला आहे. यावर्षी 99 मिमी पाऊस झाला. पूर्व दिशेला वाहणाऱ्या हवेत आद्रता आहे, ज्यामुले उत्तरेकडील हवामानावर नियंत्रण आले आहे.


  मागच्यावर्षी तीन दिवस आधीच आला होता मानसून
  मानसून 2014 मध्ये 5 जूनला, 2015 मध्ये 6 जूनला आणि 2016 मध्ये 8 जूनला आला होता. 2018 मध्ये मानसूनने केरळमध्ये तीन दिवसा आधी म्हणजेच 29 मेरोजीच हजेरी लावली होती.

Trending