आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाेपडपट्टीत सिलिंडरचा स्फोट: दाेन जणांचा हाेरपळून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - चिंचवड परिसरातील दळवीनगर येथील झाेपडपट्टीत गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास एका घरात सिलिंडरचा स्फाेट हाेऊन अाग लागल्याची घटना घडली. या घटनेत सहा घरे अागीच्या भक्ष्यस्थानी पडून तृतीयपंथीयासह दाेन जणांचा हाेरपळून मृत्यू झाला. शंकर ताताेबा क्षीरसागर (35) आणि  प्रदीप प्रकाश माेटे (38) अशी मृतांची नावे आहेत.

   
पहाटे तीनच्या सुमारास दळवीनगर येथील एका घरात सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर शेजारच्या  दोन घरांनाही आग लागली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, दोघांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत क्षीरसागर यांच्या घरातील यलम्मा देवीचे दागिने व वस्त्र जळून खाक झाले. तर अागीत सहा जणांची घरे जळून खाक झाली. या आगीत जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध पोलिस घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

 

 

बातम्या आणखी आहेत...