भारताची स्पष्ट भूमिका / डी-कंपनीचे गुन्हेगारी तंत्र दहशतवादात रूपांतरित, हा आमच्या दृष्टीने खरा धाेका ; संयुक्त राष्ट्रात भारताची स्पष्ट भूमिका

भारतात दाऊद सोने, बनावट चलन, अमली पदार्थाची तस्करी करतोय

वृत्तसंस्था

Jul 11,2019 10:49:00 AM IST

न्यूयाॅर्क - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंगळवारी भारतीय राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी दाऊद इब्राहिम व त्याच्या गँगमुळे निर्माण झालेल्या समस्येकडे लक्ष वेधले. दाऊदच्या डी कंपनीचे गुन्हेगारी तंत्र आता पूर्णपणे दहशतवादी नेटवर्कमध्ये रूपांतरित झाले आहे. हाच सर्वात माेठा धाेका असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
डी कंपनीचा बेकायदा आर्थिक व्यवहार इतर ठिकाणी भलेही कमी असेल, परंतु आमच्या उपखंडात हा व्यवहार माेठ्या प्रमाणात आहे. दाऊद आमच्या क्षेत्रात साेन्याची तस्करी, बनावट चलन, शस्त्रे व अमली पदार्थाची तस्करी इत्यादी बेकायदा कामे करताे. हे वास्तव आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना व गुन्हेगारी संघटना यांच्यात नेमके काय संबंध आहेत, यावर चर्चा करण्यात आली. १९९३ च्या मुंबईवरील बॉम्बस्फाेटाचा आराेपी दाऊद भारताला हवा आहे. तो दाऊद पाकिस्तानात दडून बसल्याची स्पष्ट झाली होती.

लष्कर, जैशवर कारवाई करायला हवी
अकबरुद्दीन यांनी लष्कर-ए-ताेयबा, जैश-ए-माेहंमदसारख्या दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. आपण एकत्र आलाे तर यश निश्चितपणे मिळू शकते, हे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विराेधातील माेहिमेवरून स्पष्ट हाेते. अल-कायदाचा साथीदार लष्कर व जैशप्रमाणेच डी-कंपनीहीदेखील माेठा धाेका आहे.

X
COMMENT