आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईला ठेका धरायला लावणारे ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमाचे 'डा रा डिंग डिंग ना...' हे गाणे रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  सौरभ वर्मा दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे. ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटातील गायक अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील यांच्या आवाजातील 'टीकिटी टॉक' हे गाणेदेखील प्रदर्शित करण्यात आले होते, यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता 'विक्की वेलिंगकर' सिनेमाचे ‘डा रा डिंग डिंग ना’ हे दुसरे गाणे अलीकडेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. 
विक्की वेलिंगकर’ चित्रपटाच्या या नवीन गाण्याचे "साज अशी की मन जुळता थांबे ना, वाऱ्यावरी, पाय खाली पण पडे ना ,डोन्ट स्टॉप टू ट्याप युअर फीट ऑन द फ्लोर,  मन बोले नाचू मोर मोर मोर, उद्यावरी आहे तुझा माझा कसला जोर, डा रा डिंग डिंग ना" हे बोल असून गाणे पीयूष अंभोरे याने गायले आणि लिहिले आहे. तर मनन मुंजाळ याने ते संगीतबद्ध केले आहे. या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णी म्हणजेच विक्की कोणाचा तरी शोध घेताना दिसत असून या गाण्यात मास्क मॅन देखील दिसत आहे. त्याशिवाय या गाण्याचा संपूर्ण मूड पूर्णपणे क्लब प्रकारचा असून हे गाणे तरुणाईला ठेका धरायला लावेल असे आहे. 

विक्की वेलिंगकर या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा आणि लोकीज स्टुडीओचे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे. हा चित्रपट 6डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...