आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने कमावले 155 कोटी रुपये, अमेझॉन प्राइम व्हिडिओने विकत घेतले डिजिटल अधिकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमित कर्ण
मुंबई - दबंग सिरीजच्या तिसऱ्या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच १५५ कोटी रुपय कमावले अाहेत. चित्रपटाने अॅमेझॉन प्राइमला ऑनलाइन स्ट्रीमिंग, टी सिरीजला संगीत आणि झी टीव्हीला सॅटेलाइट्सचे अधिकार विकले आहेत. चित्रपटात सलमान खानच्या व्यतिरिक्त साई मांजरेकर, किच्चा सुदीप, सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित 'दबंग 3' वर्षाच्या शेवटी २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

काही अशा प्रकारे कमावले १५५ कोटी चित्रपटज्ञने आपले डिजिटल अधिकार ओटीटी प्लेटफाॅर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला ६० कोटी रुपयात विकले आहेत. दुसरीकडे ८० कोटी रुपयात झी नेटवर्कने सॅटेलाइट अधिकार विकत घेतले आहेत. याव्यतिरिक्त टी सिरीजने १५ कोटी रुपयांत चित्रपटाचे संगीत अधिकार विकत घेतले आहेत.

या सिरीजचा सर्वात मोठा चित्रपट ठरणार
चित्रपटाविषयी प्रभुदेवाने सांगितले..., हा चित्रपट सलमानचा आहे. त्याला डोक्यात ठेवून त्याचे पात्र तसे रचण्यात आले. चित्रपटातील पात्र लोकांना खूप आवडेल. दोन्ही सिरीजच्या तुलनेत हा चित्रपट मोठा आणि सर्वात चांगला ठरणार आहे. चित्रपटाची निर्मिती सलमान खान, अरबाज खान आणि निखिल द्विवेदी करत आहेत. संगीत साजिद वाजिद यांचे आहे. कथा स्वत: सलमानने लिहिली आहे. चित्रपट २० डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

- 80 कोटी रुपयांत सॅटेलाइट अधिकार विकत घेतले झी नेटवर्कने
- 60 कोटी रुपयांत अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला डिजिटल राइट्स
- 15 कोट रुपयात टी सिरीजने चित्रपटाचे संगीत अधिकार घेतले