आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री दीड वाजता सलमानला सुचली होती ‘मुन्ना बदनाम’ची कल्पना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरण जैन । मुंबई

सलमान खानची हिट फ्रँचायझी ‘दबंग’चा तिसरा भाग लवकरच रिलीज होणार आहे. यापूर्वी या चित्रपटाच्या पहिल्या भागातील गाणे ‘मुन्नी बदनाम हुई’ हिट ठरले होते. आता तिसऱ्या भागामध्ये सलमान आणि दिग्दर्शक-कोरियोग्राफर प्रभू देवा ‘मुन्ना बदनाम हुआ’ या गाण्यावर थिरकताना दिसतील. नुकतेच चित्रपटाच्या टीमने कपिल शर्माच्या शोमध्ये याचे प्रमोशन केले त्या वेळी हे गाणे कसे तयार झाले, याबाबत निर्माता अरबाज खानने उपस्थितांना सांगितले.

गाणे चांगले झाले तरच चित्रपटात घेण्याचे ठरले
अरबाज म्हणाला, ‘आम्ही ‘मुन्नी बदनाम हुई’ आणि ‘फेविकॉल’सारखेच एखादे आयटम साँग शोधत होतो. ‘तितक्यात सलमानने रात्री दीड वाजता मला फोन करून लगेच भेटण्यास बोलावले आणि ‘मुन्नी बदनाम’साठी तोडीचा पर्याय मिळाल्याचे सांगितले. माझ्याशी एक तास चर्चा केल्यानंतर सलमानने अखेर आपल्या या मास्टरपीसचा खुलासा केला. तो म्हणाला की, ‘मुन्ना बदनाम’ एक परफेक्ट साँग आहे आणि आपण ते तयार केले पाहिजे. सुरुवातीला माझा या कल्पनेवर आक्षेप होता. आपण काहीतरी वेगळा विचार करू शकतो आणि जुने गाणे नवीन ढंगात घेण्यापेक्षा आपण मूळ गाणेच तयार करू शकतो, असे माझे म्हणणे होते. मात्र, सलमानला तेच करायचे होते. तथापि, ते चांगले झाले तरच ते चित्रपटामध्ये घेतले जाईल, असे वचनही सलमानने मला दिले. त्यानंतरच मी या गाण्यासाठी होकार दिला. आम्ही ही कल्पना ललितजींना ऐकवली. कारण त्यांनी ‘मुन्नी बदनाम हुई’ तयार केले होते. याच्या दुसऱ्या पर्यायासाठी साजिद-वाजिद यांनाही संधी देण्यात आली होती. दोन्हीही गाणी चांगली झाली होती, परंतु अखेर साजिद-वाजिद यांच्याच गाण्याची निवड चित्रपटासाठी करण्यात आली.’

२३ दिवस दगडाच्या खाणीत शूट झाले क्लायमॅक्स दृश्य
चित्रपटाच्या क्लायमॅक्स दृश्याची शूटिंग २३ दिवसांत पूर्ण करण्यात आली. ते मुंबईतील दहिसरमध्ये एका दगडाच्या खाणीमध्ये शूट करण्यात आले. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अॅक्शन दृश्य असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. यात सलमान आणि खलनायक किच्चा सुदीप एकमेकांसोबत फाइट करताना दिसतील. विशेष म्हणजे चित्रपटातील या महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी सलमानने २३ दिवस या शूटिंग लोकेशनलाच आपले घर बनवले होते. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. सलमाननेच या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...