Bollywood / 'दबंग 3' च्या शूटिंगचे फोटोज लीक झाल्याने चिडला सलमान, टीमला सेटच्या भिंती उंचावण्याचे दिले आदेश 

फोटो लीकच्या प्रकारानंतर सलमान सेटच्या भिंतींची वाढवणार उंची

Aug 22,2019 12:37:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : बुधवारी सलमान खानने कापला अपकमिंग चित्रपट 'दबंग 3' ची रिलीज डेट सोशल मीडियावर अनाउंस केली. त्याने सांगितले की, चित्रपट 20 डिसेम्बरला रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त सलमानने हेदेखील सांगितले की, चित्रपट हिंदीसोबतच कन्नड, तमिळ, तेलगुमध्येदेखील रिलीज होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या जयपुरमध्ये सुरु आहे. सलमानदेखील चित्रपटाशी निगडित अनेक फोटो आणि बिहाइंड द सीन वीडियो शेअर करत आहे आणि तरीही सेटवरून काही फोटोज लीक होत आहेत, ज्यामुळे सलमान खूप नाराज आहे.

सलमान सेटच्या भिंतींची वाढवणार उंची...
अशातच एक डान्स व्हिडीओ सीक्वेंस चित्रित करताना सलमान आणि सोनाक्षीचे काही फोटोज लीक झाल्यामुळे सलमान खूप चिडला होता. त्याने प्रोडक्शन, क्रिएटिव्ह आणि मार्केटिंग टीमसोबत मीटिंग करून हे निर्देश दिले आहेत की, यापुढे सेटवरून कोणतेच फोटो लीक झाले नाही पाहिजे. यामुळे सेटवर कुणालाही फोन सुरु ठेवण्याची परवानगी नाही. सोबतच आणखी जास्त सुरक्षा वाढवण्याचे निर्देशही सलमानने दिले. याव्यतिरिक्त सलमान हेदेखील म्हणाला की, पुढच्या पुणे शेड्यूलदरम्यान सेटच्या भिंतींची उंची वाढवली जावी जेणेकरून कोणतीही बाहेरची व्यक्ती आतमध्ये डोकावू नये.

X