आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींची कमाई करणारा सलमान खानचा सलग 15 वा चित्रपट बनला 'दबंग 3'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता सलमान खानच्या 'दबंग 3' ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे. 100 कोटींचा व्यवसाय करणारा सलमान खानचा हा सलग 15 वा चित्रपट आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाची 12 कोटी रुपयांची उलाढाल आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 103.85 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, किचा सुदीप, सई मांजरेकर महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत.


मागील शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या दबंग सीरिजचा तिसरा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. देशभरात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही, परंतु पाचव्या दिवशी  व्यापार विश्लेषकांनी अधिक चांगल्या व्यवसायाचा अंदाज लावला होता. खास गोष्ट म्हणजे 'दबंग 3' सलमानचा सलग 15 वा चित्रपट असून 100 कोटींची कमाई केली आहे. सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची पुष्टी झाली आहे.


शुक्रवारी या चित्रपटाची 24.50 कोटींची उलाढाल झाली. शनिवारी काही प्रमाणात वाढ झाल्याने बॉक्स ऑफिसवर 24.75 कोटी रुपये जमा झाले. रविवार चित्रपटाच्या व्यवसायात वाढ होऊन कमाईचा आकडा 31.90 कोटी रुपयांवर आला. यानंतर सोमवारी हा व्यवसाय 10.70 कोटी रुपये होता. रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे  मंगळवारी या चित्रपटाची कमाई 12 कोटी रुपये आहे.

चित्रपट

रिलीज

कलेक्शन

दबंग10 सप्टेंबर 2010

141 कोटी रुपये

रेडी03 जून 2011120 कोटी रुपये
बॉडीगार्ड31 ऑगस्ट 2011144 कोटी रुपये
एक था टाइगर15 ऑगस्ट 2012186 कोटी रुपये
दबंग 221 डिसेंबर 2012149 कोटी रुपये
जय हो24 जानेवारी 2014109 कोटी रुपये
किक25 जुलै 2014211 कोटी रुपये
बजरंगी भाईजान17 जुलै 2015315 कोटी रुपये
प्रेम रतन धन पायो12 नोव्हेंबर 2015194 कोटी रुपये
सुल्तान06 जुलै 2016300 कोटी रुपये
ट्यूबलाइट23 जून 2017114 कोटी रुपये
टायगर जिंदा है22 डिसेंबर 2017339 कोटी रुपये
रेस 315 जून 2018166 कोटी रुपये
भारत05 जून 2019197 कोटी रुपये
दबंग 320 डिसेंबर 2019आतापर्यंत 103 कोटी रुपये

बॉक्स ऑफिस इंडियानुसार आकडेवारी

बातम्या आणखी आहेत...