आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dabg 3 Actor Daddy Pandey Got Heart Attack, Salman Khan's Team Is Taking Special Care

'दंबग 3' चे अभिनेते दद्दी पांडे यांना आला हार्ट अटॅक, सलमान खानची टीम घेत आहे विशेष काळजी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खान प्रत्येकाची मदत करण्यासाठी नेहमी पुढे असतो. तो सध्या 'दबंग 3' चे शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान त्याचा एक को-स्टार दद्दी पांडेला हार्ट अटॅक आला. ते चित्रपटात कॉन्स्टेबलचा रोल साकारत आहे. मात्र जेव्हा त्यांना अटॅक आला तेव्हा ते सेटवर नव्हते. पण जसे सलमानयाची माहिती मिळाली त्याने शूटिंग थांबवून अभिनेत्याच्या मदतीसाठी आपल्या टीमला पाठवले. 

 

एका इंग्रजी वेबसाइटनुसार, दद्दी यांना गोरेगांवच्या एका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना 2-3 दिवसात रुग्णालयातून सुट्टी मिळेल. सलमान आपल्याकडून त्यांना पौर्ण मदत करत आहे.  

 

9 वर्षांपूर्वीही केली होती आजारी टीव्ही अभिनेत्याची मदत... 
हे पहिल्यांना नाही जेव्हा सलमानने कुणाची मदत केली असे. यापूर्वी त्याने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' चा अभिनेता कवि कुमार आजादहीदेखील मदत केली होती. आजाद शोमध्ये डॉक्टर हाथीची भूमिका साकारत होते. मागच्यावर्षी हार्ट अटॅकमुळे त्यांचे निधन झाले. 9 वर्षांपूर्वी जेव्हा कवि यांना हार्ट अटॅक आला होता त्यावेळी सलमाननेच त्यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च केला होता.  

 

डिसेंबरमध्ये रिलीज होईल चित्रपट... 
चित्रपट 'दबंग 3' बद्दल बोलायचे तर हा चित्रपट यावर्षी 20 डिसेंबरला रिलीज होईल. याचे दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहे. शूटिंगचे पहिले शेड्यूल मध्यप्रदेशमध्ये ठेवले गेले होते. चित्रपटात सोनाक्षी सिन्हा (रज्जो) आणि अरबाज खान (मक्खी) हेदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तर व्हिलन म्हणून साउथ अभिनेता सुदीप दिसणार आहे.  
 

बातम्या आणखी आहेत...