आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर हत्या प्रकरण : पुनाळेकर, विक्रम भावेला १ जूनपर्यंत कोठडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी शनिवारी अटक केलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुणे सत्र न्यायालयाने रविवारी दुपारी १ जूनपर्यंत सीबीआय कोठडीचे आदेश दिले. सीबीआयने शनिवारी या दोघांना मुंबईत अटक केली होती. 


दाभोळकर हत्या प्रकरणी पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे, असे आरोप संजीव पुनाळेकरवर आहेत. तर आरोपींना दाभोळकरांची ओळख करून देणे, घटनास्थळाची रेकी करणे, असे आरोप भावे याच्यावर आहेत. न्यायालयात पुनाळेकर म्हणाले, की कर्नाटक पोलिसांनी कळसकरच्या जवाबाच्या आधाराने मला अटक केली आहे. प्रत्यक्षात मी आरोपींचा वकील असताना, मला अटक करणे चुकीचे आहे. भावेदेखील माझे सहायक आहेत. सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येसाठी आरोपींनी मोटरसायकल वापरली होती. तिच्या तपासासाठी भावेची चौकशी क्रमप्राप्त आहे. पुनाळेकरने हत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी मदत केली आहे.