आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dad's Devastating Diagnosis After Collapsing At Family Picninc, Doctors Reveals Shocking Illnes

साधी डोकेदुखी समजून डॉक्टर देत राहिले मायग्रेनचे औषध, एकेदिवशी बेशुद्ध पडल्यानंतर सत्यासोबत झाला सामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही स्टोरी 'मेडिकल सायन्स' सीरीजवर आधारित आहे. जगभरात मेडिकल सायन्सशी निगडीत अनेक शॉकिंग स्टोरीज असतात, त्यापैकी ही एक आहे.)


फ्लोरिडाः फ्लोरिडामध्ये राहणा-या एका तरुणाला दीर्घ काळापासून डोकेदुखीचा त्रास होता. तो या दुखण्याला मायग्रेन समजत होता. डॉक्टरही त्याला मायग्रेनचे औषध द्यायचे. पण एकेदिवशी हा तरुण त्याच्या कुटुंबीयांसोबत पिकनिकला गेला आणि अचानक त्याला भोवळ आली. मेडिकल चाचण्यानंतर हैराण करणारे सत्य समोर आले.

 

- झाले असे की, फ्लोरिडाच्या ओरलेंडोमध्ये राहणारा 35 वर्षीय बैरी रीड एका वॉटर पार्कमध्ये बेशुद्ध पडला. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याचे सीटी स्कॅन करणअयात आले, त्यात त्याच्या डोक्याच्या मध्यभागी एक जीवघेणा ट्युमर असल्याचे समोर आले. 
- डॉक्टर्स हे बघून हैराण झाले, कारण दीर्घ काळापासून बैरीवर मायग्रेनची ट्रीटमेंट सुरु होती. पण सीटी स्कॅनमध्ये काही वेगळेच समोर आले.


क्षणभरात बदलले आयुष्य.. 

- बैरीने एका मुलाखतीत सांगितले, ''मला शुद्ध आली, तेव्हा माझे सीटी स्कॅन सुरु होते. एमआरआय स्कॅननंतर डॉक्टरांनी माझ्या डोक्याच्या उजव्या भागात ट्युमर असल्याचे सांगितले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभरात माझे आयुष्य बदलून गेले होते.

 

सुरुवातीला व्हायची फक्त डोकेदुखी
- रिपोर्ट्सनुसार, बैरीला सुरुवातीच्या काळात फक्त डोकेदुखीचा त्रास होता. त्याच्या शरीरात ब्रेन ट्युमची लक्षणे नव्हती.


झाली शस्त्रक्रिया..
- बैरीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तातरीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण या शस्त्रक्रियेत रुग्णाला शुद्धीवर ठेवले जाते. त्याच्या डोक्याचा भाग सुन्न केला जातो. रुग्णाला अॅनेस्थिशिया देता येत नाही.

 

सर्जरीनंतर झाली बैरीची ब्रेन टेस्ट..

- बैरीच्या डोक्यात 3.5 cm चा ट्यूमर होता. डॉक्टरांना शस्त्रक्रिया करुन त्याच्या डोक्यातून ट्युमरचा बराचसा भाग काढण्यात यश आले. पण काही भागात ट्युमर डोक्याला चिकटून असल्याने काही भाग सोडावा लागला.  काही दिवसांनी बैरीची ब्रेन टेस्ट करण्यात आली.

 

डोकेदुखीकडे दुर्लक्ष करु नका...
- बैरीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका वरिष्ठ डॉक्टरांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, डोकेदुखीकडे दुर्लक्ष करु नये. लोक नेहमी डोकेदुखीच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष झाल्यास कधीकधी रुग्णाचा जीव जाऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...