आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gay मुलाला 'बरे' करण्यासाठी सावत्र आईसोबत संबंध ठेवण्यास मजबूर करायचा बाप; स्ट्रिप पोकर खेळून केली सुरुवात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - खुल्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या युरोपियन राष्ट्रांत सुद्धा समलैंगिकांवर किती अत्याचार होतात याचा खुलासा एका युवकाने केला आहे. द संडे मिरर या ब्रिटिश साप्ताहिकाशी संवाद साधताना त्याने आपली आपबिती सांगितली. तो फक्त 11 वर्षांचा जेव्हा त्याच्या आई वडिलांना आपला मुलगा समलैंगिक असल्याचे कळाले. पीडित युवकाने सांगितल्याप्रमाणे, त्याच्या वडिलांना समलैंगिकता एक रोग वाटत होता. अशात त्याने उपचाराच्या नावाने मुलावर इतके अत्याचार केले की त्याचे संपूर्ण लहानपण हरवले. त्याला आई-वडिलांच्या परफ्यूमची सुद्धा भीती वाटायची. या अत्याचारांच्या 20 वर्षांनंतर त्याने आपल्या दोषी वडील आणि सावत्र आईला गजाआड पाठवले.


सावत्र आईसोबत सेक्ससाठी मजबूर करायचा बाप...
- डॅनिएल डाउलिंग (34) या युवकाने मुलाखतीमध्ये आपल्यावर झालेल्या अत्याचारांची हकीगत मांडली आहे. त्याचे वडील रिचर्ड डाउलिंग ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. डॅनिएल 11 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांना आपला एकुलता एक मुलगा गे असल्याचे कळाले. रिचर्ड आणि त्याची दुसरी पत्नी अॅनेट यांनी समलैंगिकता एक रोग असल्याचे सांगत मुलावर अमानवीय अत्याचार सुरू केले. 
- इतक्या लहान वयात वडील रिचर्ड यांनी आपल्या मुलाला पॉर्न दाखवण्यास सुरुवात केली. नकार दिला तरीही ते त्याला बळजबरी पॉर्न मूव्हीज दाखवायचे. काही दिवसांतच डॅनिएलसमोर त्याच्या सावत्र आईच्या शरीराचे प्रदर्शन सुरू केले. यानंतर मारहाण करून अॅनेटसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास मजबूर केले. एवढेच नव्हे, तर एकाच खोलीत मुलाला झोपवून अश्लीलतेच्या सर्वच सीमा ओलांडल्या. डॅनिएल थोडासाही नकार देत असल्याचे दिसताच त्याच्या तोंडावर आणि पोटात लाथा-बुक्क्या मारायचा.


स्ट्रिप पोकर खेळाने केली अत्याचाराची सुरुवात
डॅनिएलने 11 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांना सांगितले होते की त्याला मुली आवडत नाहीत. हळू-हळू आपला मुलगा समलैंगिक असल्याची रिचर्डला खात्री पटली. डॅनिएलने सांगितल्याप्रमाणे, "मला आजही आठवते तो दिवस रविवारचा होता. माझ्या वडिलांनी सावत्र आईसोबत स्ट्रिप पोकर खेळू असे सांगितले होते. हा गेम नेमका काय असतो याची मला काहीच माहिती नव्हती. खेळात हारणाऱ्याने एक-एक करून कपडे काढायचे होते. गेम संपला तोपर्यंत माझी सावत्र आई माझ्यासमोर निर्वस्त्र बसली होती. त्या दोघांनीही मला तिला स्पर्श करण्यास सांगितले. वडील सांगतात म्हणून ऐकत गेलो आणि दोघांनी मिळून अश्लीलतेच्या सर्वच सीमा ओलांडल्या. त्यांनी माझे लहानपण हिरावून घेतले. यापुढे तब्बल 20 वर्षे मला सावत्र आईच्या परफ्यूमची सुद्धा भीती वाटायची."


आईला 8 तर बापाला 5 वर्षांची कैद...
आरोपी रिचर्ड आणि त्याची पार्टनर अॅनेट त्यावेळी 38 वर्षांचे आणि आता 62 वर्षांचे आहेत. आपल्यावर झालेल्या अत्याच्या 20 वर्षानंतर डॅनिएलने क्रूरकर्मा बाप आणि सावत्र आईविरुद्ध तक्रार दाखल केली. तसेच पुरावे सादर करून दोघांनाही पोलिसांच्या हवाली केले. नुकतेच कोर्टाने आरोपी बापाला 5 वर्षे आणि आरोपी सावत्र आईला 8 वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे.

बातम्या आणखी आहेत...