आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतून फोन आल्यानंतर 6 वर्षीय मुलीला घेण्यासाठी पोहोचले वडील, टीचरने नोटीस केली त्यांची पँट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही स्टोरी 'सोशल व्हायरल सिरीज' अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर अशा स्टोरीज व्हायरल होत आहेत आणि या तुम्हीही जाणून घ्याव्यात.)
उताह : अमेरिकेतील एका शाळेमध्ये सहा वर्षाच्या मुलीने ड्रेसमध्येच लघवी केली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी फोन करून तिच्या वडिलांना बोलावून घेतले. मुलीचे वडील तिला घेण्यासाठी शाळेमध्ये येताच त्यांना पाहून शाळेतील शिक्षक चकित झाले. तिच्या वडिलांची पँटसुद्धा ओली होती. हे पाहताच शाळेतील शिक्षकांना संपूर्ण गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी वडिलांच्या समजूतदारपणाचे आणि हुशारीचे कौतुक केले. खरं तर वडिलांनी हे काम मुलीला तिने केलेल्या चुकीमुळे वाईट वाटू नये यासाठी केले होते.


वडिलांनी शोधली जबरदस्त आयडिया 
- ही स्टोरी उताह स्टेटमध्ये शिकणारी सहा वर्षाची मुलगी व्हॅलरी आणि तिचे वडील बेन सोवार्ड यांची आहे. व्हॅलरीने एके दिवशी शाळेत आपल्या ड्रेसमध्येच सुसु केली. ही गोष्ट टीचरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्या वडिलांना शाळेत बोलावून घेतले.
- मुलीच्या वडिलांना असा मॅसेज मिळाल्यानंतर ते समजून गेले की त्यांना आता काय करायचे आहे. ते फक्त मुलीला घेण्यासाठी शाळेत आले नाही तर मुलीने केलेल्या चुकीमुळे तिला वाईट वाटू नये यासाठीही त्यांनी एक शक्कल लढवली.
- मुलीला घेण्यासाठी शाळेबाहेर पोहोचल्यानंतर बेनने एका बॉटलमधील पाण्याने आपल्या पँटचा समोरील भाग ओला केला, ज्यामुळे असे वाटेल की वडिलांनीही पँटमध्ये लघवी केली.


डाग लपवण्यासाठी मुलीकडे मागितली तिची बॅग
- स्वतःची पँट ओली केल्यानंतर बेन मुलीला घेण्यासाठी थेट प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये पोहोचले. मुलीला पाहताच तिच्याजवळ गेले आणि हळूच तिला आपली ओली पँट दाखवत हा डाग लपवण्यासाठी लवकर तुझी बॅग दे असे म्हणाले. त्यानंतर बेन म्हणाले की, घाईघाईत कंट्रोल करू शकलो नाही आणि असे घडले.
- वडिलांचे बोलणे सुरवातीला व्हॅलरीच्या लक्षात आले नाही, परंतु वडिलांची ओली पँट पाहून तिला सर्वकाही लक्षात आले आणि ती हसली. तिचा हसरा चेहरा पाहून बेन यांना समजले की त्यांचा प्लॅन सक्सेस झाला आणि आता सर्वकाही ठीक आहे.
- बेन यांनी असे करण्यामागचे कारण म्हणजे मुलीला असे वाटू नये की ड्रेसमध्ये सुसु करणे एखादा मोठा गुन्हा आहे किंवा या घटनेनंतर तिने शाळेत जाण्यासाठी नकार देऊ नये. यामुळे त्यांनी स्वतःची पँट ओली करून मुलीला हे समजावून सांगितले की, एमर्जन्सीत ड्रेसमध्येच सुसु करणे नॉर्मल आहे आणि ही चूक कोणाकडूनही होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...