आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांच्या धाडनंतर घरात लाकडी पिंजऱ्यात सापडला 4 वर्षांचा मुलगा; मरणासन्न अवस्थेत बरडड्याही आल्या होत्या बाहेर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीव्ह - यूक्रेनमध्ये एका नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने आपल्याच 4 वर्षांच्या मुलाला मरेपर्यंत उपाशी ठेवण्याचा प्रयत्न करताना त्याचा अक्षरशः सांगाडा केला होता. आरोपीला संशय होता की हा मुलगा आपला नसून दुसऱ्या एखाद्या पुरुषाचा आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांतून तो जन्माला आला असे त्याला वाटत होते. त्याच रागात आरोपीने मुलाची अशी अवस्था केली. यासोबतच, सर्वच काही पाहून आई शांत कशी बसली असा सवाल पोलिसांनी उपस्थित केला. तसेच तिच्या विरोधात सुद्धा चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी घरावर धाड टाकून त्या बाळाची सुटका केली, तोपर्यंत त्याची अवस्था इतकी वाइट झाली होती की त्याच्या शरीराला माशा लागल्या होत्या.


> ही घटना ऑगस्ट 2018 मध्ये युक्रेनच्या नोवोक्रेइंका शहरात समोर आली होती. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी घरावर धाड टाकली आणि तेथून या मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुलाची सुटका केली. कित्येक दिवसांपासून उपाशी असल्याने मुलाच्या बरगड्या बाहेर आल्या होत्या. त्याच्या संपूर्ण शरीरावर माशाच माशा होत्या. आणखी काही तासांचा विलंब झाला असता तर त्याचा जीव गेला असता असे डॉक्टरांनी सांगितले.
> व्लादिक मोल्चेंको नावाच्या या मुलाने गेल्या कित्येक दिवसांपासून अन्नाचा एक घासही खाल्ला नव्हता. रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याचे वजन फक्त 7 किलो होते. त्याला लाकडी पिंजऱ्यात बंद करण्यात आले होते. संपूर्ण शरीरावर त्याचे मल-मूत्र लागले होते. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी केली तेव्हा त्याची ही अवस्थात त्याच्या बापाने केल्याचे समोर आले. पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपीला शिक्षा देण्यासाठी डीएनए चाचणी झाली तेव्हा तो त्याचाच मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. त्याची शंका तर दूर झाली. परंतु, त्याच एका संशयाने मुलाचे जीव जाता-जाता वाचला आणि स्वतःला आजन्म तुरुंगात राहावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...