आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे मारहाणप्रकरणी पाच जणांना अटक व सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- भाजपच्या बीड लोकसभा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणारे काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली हाेती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पोलिसांनी स्वप्निल गलधरसह पाच जणांना अटक केली. काही तासांतच त्यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान, पोलिसांनी दाखल केलेल्या सरकारी कामकाजाच्या अडथळा प्रकरणातही दोन जणांना अटक दाखवण्यात आली आहे.  

 

भाजपच्या लोकसभा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी बुधवारी सकाळच्या सत्रात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला होता.  मुंडे जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारतीबाहेर पडत असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना घेराअो करून मारहाण केली होती. या प्रकरणात भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गलधर, संतोष राख, बंटी फड यांच्यासह इतर २५ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. हल्ल्यानंतर सर्व जण फरार झाले होते.   गुरुवारी रात्री पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सांगडे यांनी औरंगाबादेतून स्वप्निल गलधर, संग्राम बांगर, अमोल परळकर, मोहम्मद अझरुद्दीन मोहम्मद सलीम, शेख इरशाद शेख रज्जाक या पाच जणांना ताब्यात घेत  शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...