आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rescued: सुटका होताच 4 वर्षांची मुलगी म्हणाली, मी खात होते तेव्हा डॅडींनी चटके दिले; शरीरावर सापडल्या इतक्या जखमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - येथील एका एनजीओने अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीची अमानवीय अत्याचारातून सुटका केली आहे. ती आपल्या आई आणि आईच्या लिव्ह इन पार्टनरसोबत राहत होती. या दरम्यान आई आणि कथित डॅडीने तिच्यावर इतके अत्याचार केले की तिची सुटका करणाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले. तिच्या शरीरावर विविध ठिकाणी चटके आणि मारहाणीच्या खुणा सापडल्या आहेत. सुटका होताच एनजीओच्या स्वयंसेवींकडे ती गेली आणि इतकुशा जीवावर बेतलेल्या अत्याचाराची आपबिती मांडली. 
 

बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या एनजीओने मंगळवारी या मुलीची सुटका केली. स्वयंसेवींकडे जाताच माझ्या डॅडींनी मला चटका दिला असे दाखवले. ती म्हणाली, "मी खात बसले होते. त्याचवेळी डॅडींनी सुरुवातीला मला मारहाण केली. यानंतर गरम चमच्याने मला डाग आणि चटके दिले." या मुलीच्या किंकाळ्या ऐकूण शेजाऱ्यांनी बाल हक्कांसाठी काम करणारे समाजसेवक अच्युत राव यांना मेसेज केला. या प्रकरणी पीडित मुलीची आई आणि तिच्या लिव्ह इन पार्टनर विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. 


25 वर्षीय महिलेने काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिप सुरू केली होती. काही दिवसांतच दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यांनी एमेकांवरचा राग या 4 वर्षांच्या मुलीवर काढण्यास सुरुवात केली. राव यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या दोघांना चिमुकल्या मुलीचा अडथळा झाला होता. आईला आपल्या नवीन पार्टनरसोबत राहण्याचा अधिकार होता. परंतु, मुलीमुळे तिला स्वातंत्र्य मिळत नव्हते. याचा राग देखील ती मुलीवर काढत असावी. दरम्यान, पीडित मुलीला सरकारी बालगृहात पाठवण्यात आले असून आई आणि तिच्या पार्टनरची पोलिस चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...