आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगडी सायकलीला अडकवून राेज 25 किमी प्रचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर : साेलापूर शहरातील प्रचार शिगेला पाेहाेचला अाहे. त्यात अनेक गमती-जमतीही पाहायला मिळताहेत. साेलाापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एक सायकलवाला फिरताना दिसताे. हँडलला गॅसशेगडी अडकावून ताे दरराेज २५ किलाेमीटर फिरताे. लाेकांना वाटते, की शेगडी दुरुस्ती करणारा असावा. परंतु ताे 'शेगडी' चिन्हाचा प्रचार करणारा कार्यकर्ता अाहे. चाैकात उभे राहून, भाषणही ठाेकताे. त्यानंतर लाेकांचा सत्कार स्वीकारताे.

श्रीनिवास दत्तात्रय यन्नम ऊर्फ कामटे असे त्यांचे नाव. शहीद पाेलिस अधिकारी अशाेक कामटे यांचा चाहता. कामटेंसारखेच गुळगुळीत डाेके असल्याने त्यांचे नाव 'कामटे'च पडले. कामटे म्हणवून घेण्यातच यन्नम यांना खरी माैज वाटते. असे हे कामटे अपक्ष उमेदवार महेश काेठे यांचा प्रचार करत अाहेत. सकाळी उठल्याबराेबर शेगडी सायकलला बांधली, की सुरू झाला, त्यांचा प्रवास. मागच्या कॅरेलवर बॅटरी असून, हातात छाेटेसा भाेंगा घेऊन ते लाेकांना अावाहन करतात... शेगडी.. शेगडी... अन्् शेगडी.

मनपा निवडणूक लढवली, बरखास्तीच्या मागे लागले
कामटे म्हणजे एक अजब रसायन अाहे. ते वृक्षप्रेमी अाहेत. राेपे लावून जगवण्याची भारी हाैस. दुसरीकडे समाजकारण अन् राजकारणातही तेवढाच रस. त्यांनी महापालिका निवडणूक लढवली, परंतु अपयशी ठरले. महापालिकेवर भाजपची सत्ता अाल्यानंतर दाेन्ही मंत्र्यांतील भांडणे पाहून महापालिका बरखास्त करण्याची मागणी लावून धरली. नगरसेवक देवेंद्र काेठे यांचे ते चुलत सासरे अाहेत. व्याही निवडून यावेत, असे त्यांना वाटते. त्यासाठीच त्यांनी हा प्रचाराचा फंडा सुरू केला.
 

बातम्या आणखी आहेत...