Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Daily Horoscope for 09th november 2018

आजचे राशीभविष्य : कसा असेल तुमचा शनिवार, जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:00 AM IST

आपला दिवस कसा असेल हे आपण दैनंदिन राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

 • Daily Horoscope for 09th november 2018

  सगळीकडे सध्या दिवाळीचा उत्साह आहे. याच उत्साहाच्या वातावरणामध्ये आपला दिवस कसा जाईल याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. याबाबत ग्रहतारे काय सांगतात, आणि त्यानुसार आपला दिवस कसा असेल हे आपण दैनंदिन राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, 12 राशींचे राशीफळ..

  मेष - सहकारी तुमच्या शब्दाला मान देतील. बसल्या जागेवरून इतरांना कामाला लावाल. जाेडीदाराच्या भावना समजून घ्याल. प्रेमप्रकरणांना मात्र हात जोडा. शुभ रंग :मोरपंखी, अंक-5.

  वृषभ - काही अनपेक्षीत घटनांमुळे दैनंदीन वेळापत्रक कोलमडणार आहे. साहित्यिकांची लिखाणे प्रसिध्द होतील. गृहीणींना आज माहेरची ओढ लागेल. शुभ रंग :मोतिया, अंक-2

  मिथुन - घराबाहेर तुमचे वक्तृत्व व कतृत्वही प्रभावशाली ठरेल‌‌. तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. हक्कांसाठी लढाल. मुले अज्ञाधारकपणे वागतील. शुभ रंग : सोनेरी, अंक-1.

  कर्क - दैनंदीन व्यवहार सुरळीत पार पडतील. धवपळीत प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. गृहीणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवणे हिताचे राहील. मित्र हिताचेच सल्ले देतील. शुभ रंग : मरुन, अंक-5.

  सिंह - व्यवसायातील समस्यांचा चातुर्याने सामना कराल. नवीन उपक्रम राबवण्यासाठी सिध्द असाल. सहकार्यांवर अंकूश राहील. हुकुमशाही तत्वप्रणाली मात्र नकाे. शुभ रंग : केशरी, अंक-६.

  कन्या - राशीच्या लाभात असलेला चंद्र तुमच्या धनाची वृध्दी करणार आहे. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. उपवर मुलामुलींना अपेक्षित स्थळे येतील. शुभ रंग : डाळिंबी, अंक-८.

  तूळ - राशीच्या कर्मस्थानातून भ्रमण करणारा चंद्र व्यवसायात मरगळ दूर करेल. कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. वरीष्ठ तुमच्या कार्यपध्दतीचे कौतुक करतील. शुभ रंग : पांढरा, अंक-7.

  वृश्चिक - राशीच्या भाग्यातून भ्रमण करणारा चंद्र पात्रतेपेक्षा जास्तच देणार आहे. आज दानधर्म कराल. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे मात्र टाळा. शुभ रंग:पिवळा, अंक-3

  धनू - सहासी निर्णय आज नकोत. न मागता सल्ले देण्याने नाती दुरावतील. गरजेपुरते बोला. सासुरवाडी कडून लाभ होणार आहेत. हाती पैसा खेळता राहील. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-४.

  मकर - आज दिवसाची सुरवात कंटाळवाणी झाली असली तरी उत्तरार्ध मात्र अनुकूल आहे आपल्या जोडीदाराची तोंडभरुन स्तुती करणे अत्यंत हिताचे राहील. शुभ रंग : चंदेरी, अंक-6.

  कुंभ - आज आर्थिक व्यवहारातील अडचणी दूर होतील. नोकरीच्या ठीकाणी न आवडणारी जबाबदारी स्वीकारावी लागेल. गुणवत्तेचे योग्य मूल्यांकन होईल. शुभ रंग : भगवा, अंक-9.

  मीन - हौसमौज करण्यास आज मुबलक पैसा उपलब्ध होईल. छान दिवस असून आज अवघड समस्या सहज सुटणार आहेत. मुलांसाठी वस्त्र खरेदी कराल. शुभ रंग : आकाशी, अंक-3.

Trending