Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Daily Horoscope for 2ndseptember

2 सप्टेंबर राशीफळ - जाणून घ्या कसा असेल तुमचा या महिन्यातील पहिला रविवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 02, 2018, 12:07 AM IST

12 राशींच्या स्वामींसाठी हा रविवार नेमका कसा असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • Daily Horoscope for 2ndseptember

    सप्टेंबर महिन्यातील पहिल्या रविवारी श्रीकृष्ण जयंती आहे. रात्री 12 वाजता श्रीकृष्णजन्मोत्सव साजरा केला जाईल. पण 12 राशींच्या स्वामींसाठी हा रविवार नेमका कसा असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

    पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, 12 राशींचे राशिफळ..

  • Daily Horoscope for 2ndseptember

    मेष                         
    पैशाअभावी रखडलेली कामे कार्यान्वित होतील. मित्रपरीवारात मोठेपणा मिळेल. आप्तस्वकीय शब्दास मान देतील. वैवाहिक जीवनांत सौख्य व समाधान राहील.   

     शुभ रंग : आकाशी, अंक- ६.  


     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    वृषभ 
    खर्चाचे प्रमाण वाढले असले तरी आर्थिक ओढाताण संभवत नाही. आज आपलेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. दिलेले शब्द पाळावे लागतील.   

    शुभ रंग : मरुन, अंक- ५.

     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    मिथुन 
    समाजिक कार्य करणाऱ्यांना मतभेदांस सामोरे जावे लागेल. दानधर्म करताना आधी शिल्लक तपासा. स्वत:चा स्वार्थ साधून घेणे जास्त गरजेचे आहे.             

    शुभ रंग : गुलाबी, अंक-७. 


     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    कर्क                     
    मित्रमंडळींवर आज तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक राहील. व्यावसायात आज अपेक्षेपेक्षा जास्तच नफा होईल.     

    शुभ रंग : निळा, अंक-४.

     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    सिंह
    आर्थिक स्तर उंचावेल. मनात येणाऱ्या सर्व गोष्टी पूर्णत्वास जातील. मुलांच्या समजुतीने घेवून त्यांचे हट्ट स्वखुशीने पुरवाल. गरजूंना मदत कराल.       

    शुभ रंग : राखाडी, अंक-३

     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    कन्या 
    कलाकारांचा परदेशातही गौरव होईल. भविष्याच्या दृष्टीने आज एखादी गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्याल. वृध्दांची मने सांभाळावी लागतील.   

    शुभ रंग : पिस्ता, अंक- ८.


     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    तूळ
    एकावर विसंबून दूसऱ्यास अश्वासने देवू नका. कार्यक्षेत्रात स्वावलंबन महत्वाचे राहील. महत्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई मुळीच करु नका.     

    शुभ रंग : अबोली, अंक, -५


     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    वृश्चिक
    आत्मविश्वासाने केलेली कामे शंभर टक्के यशस्वी होतील. आज जोडीदाराच्या आवडीनिवडी कडे विशेष लक्ष द्याल. कुठल्याही लोभापायी मोहात अडकू नका.       

    शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक, -२


     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    धनू
    आर्थिक बाजू थोडी कमजोर असली तरी पूर्वीची येणी वसूल होण्याची शक्यता आहे. आज थोडे व्यवहारी रहा व झेपतील त्याच जबाबदाऱ्या स्विकारा.     

    शुभ रंग : सफेद, अंक-१.


     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    मकर
    आर्थिक विवंचना मिटतील. आज प्रिय व्यक्तीच्या लहरी सांभाळाव्या लागतील. उच्चशिक्षितांना लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या चालून येतील. आनंदी दिवस.       

    शुभ रंग : चंदेरी, अंक-९


     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    कुंभ
    दैनंदीन व्यवहार सुरळीत पार पडतील. जोडीदारासह आज जुन्या आठवणींना उजाळा द्याल. मुले पालकांच्या आज्ञेत असतील. गृहसौख्याचा दिवस. 

    शुभ रंग: मोरपंखी, अंक- १


     

  • Daily Horoscope for 2ndseptember

    मीन
    लेखक व पत्रकार मंडळींच्या कामाचे कौतुक होईल. आज इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यची उमेद निर्माण होईल. प्रामाणिक मेहनतीस न्याय मिळेल.         

    शुभ रंग: पांढरा, अंक-५

Trending