Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Daily horoscope for 8th November 2018

राशीभविष्य : दिवाळीच्या पाडव्याला कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या आजचे राशीफळ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:04 AM IST

अत्यंत शुभ असलेला आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत.

 • Daily horoscope for 8th November 2018
  आज बलिप्रतिपदा. म्हणजेच दीपावली पाडवा. हिंदु परंपरेनुसार वर्षातील सर्वात शुभ समजल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा आजचा दिवस असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा मुहूर्त अत्यंत उत्तम समजला जातो. तसेच विविध वस्तुंच्या खरेदीही आजच्या मुहूर्तावर केली जाते. असा हा अत्यंत शुभ असलेला आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत. पाहुयात कसा असेल तुमचा आजचा दिवस.
  पुढील स्लाइड्सवर वाचा 12 राशींचे राशीफळ...

 • Daily horoscope for 8th November 2018
  मेष
  हातचे काम सोडून इतर काही कामे तुम्हाला आकर्षित करतील. एक ना धड भाराभर चिंध्या अशी गत होईल. विनाकारण इतरांच्या भानगडीत डोकवाल. 
  शुभ रंग : मरुन, अंक, -६
    
   
   
   
 • Daily horoscope for 8th November 2018
  वृषभ 
  आज तुमचे मनोबल उत्तम असून आत्मविश्वास वाढेल. धंद्यातील अडचणींना खंबीरपणे तोंड द्याल. काही शुभ समाचार कळतील. आशादायी  दिवस.    
  शुभ रंग: मोरपंखी, अंक- २.
   
   
   
 • Daily horoscope for 8th November 2018
  मिथुन 
  आज एखादी हवलेली वस्तू परत शोधल्याने सापडू शकेल. काही अनुत्तरीत प्रश्नांचीही अाज उत्तरे मिळतील.   काही दूरावलेली नाती आज जवळ येतील.
  शुभ रंग : सोनेरी, अंक-१. 
   
   
   
 • Daily horoscope for 8th November 2018
  कर्क                     
  विपरीत परीस्थितीशी झुंज द्यावी लागणार आहे. जमाखर्चाचा ताळमेळ ही तारेवरची कसरत असणार आहे. फार विचार न करता आजचा दिवस जगून घ्या.
  शुभ रंग : चंदेरी, अंक-९.
   
   
 • Daily horoscope for 8th November 2018
  सिंह
  नवे उपक्रम सुरु करायचे असतील तर आजचा दिवस अनुकूूल आहे. प्रतिष्ठीतांशी असलेल्या ओळखी योग्य वेळी कामी येतील व क्लीष्ट कामे सोपी होतील.
  शुभ रंग : क्रिम, अंक-८. 
   
   
 • Daily horoscope for 8th November 2018
  कन्या 
  रीकामटेकडया मंडळींच्या नादी न लागता आज कर्मास प्राधान्य द्याल तर यश हात जोडून उभे राहील. आज कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊ शकाल.
  शुभ रंग : अबोली, अंक- ३.         
   
   
   
 • Daily horoscope for 8th November 2018
  तूळ
  नोकरी व्यवसायात काहीसे तणावाचे वातावरण असेल. पूर्वीच्या काही चुकाही निस्तराव्या लागतील. आज घरात थोरांच्या वयाचा मान राखावा लागेल.
  शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक- २.
   
   
   
 • Daily horoscope for 8th November 2018
  वृश्चिक                    
  काही कौटुंबिक कटकटी अाज तुम्हाला त्रस्त करतील. नोकरीच्या ठीकाणी डोके व मन शांत ठऊन काम करा. आज घराबाहेर वावरताना क्रोधावर नियंत्रण हवे. 
  शुभ रंग : पिस्ता, अंक, -५
   
   
   
 • Daily horoscope for 8th November 2018
  धनू
  महत्वाच्या चर्चा, बैठकीत आज आपले विचार इतरांना पटवून देता येतील. अंगी असलेल्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल.  परिवारातील सामंजस्य ही जमेची बाजू असेल.       
  शुभ रंग : गुलाबी, अंक-७
   
   
   
 • Daily horoscope for 8th November 2018

  मकर
  काही कुवतीबाहेरची कामे करावी लागतील. दुसऱ्यावर अवलंबून कोणतेही निर्णय घेऊ नका. आक्रमकता टाळून सामंजस्याचे धोरण स्वीकारा.
  शुभ रंग : निळा, अंक-४.       

   

   

 • Daily horoscope for 8th November 2018

  कुंभ
  म्हणेन ती पूर्व असा आजचा दिवस. अथक परिश्रमांना आज दैव साथ देईल. सणासुदीच्या निमित्ताने काही प्रिय   मित्रमंडळींचा सहवास लाभेल. छान दिवस.     
  शुभ रंग: पांढरा, अंक-४.


   

 • Daily horoscope for 8th November 2018

  मीन
  आपल्या नम्र वागणूकीने थोरामोठयांचे अशिर्वाद मिळवाल. उद्योग व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. गृहीणींचे कष्ट कारणी लागतील.        
  शुभ रंग: मोरपंखी, अंक- १.

Trending