Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Daily Horoscope for 9th september 2018

9 सप्टेंबर 2018 राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल तुमच्या राशीसाठी आजचा रविवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 12:00 AM IST

9 सप्टेंबर 2018 राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल तुमच्या राशीसाठी आजचा रविवार

 • Daily Horoscope for 9th september 2018

  Today Horoscope (9 Sep 2018, आजचे राशिभविष्य)
  कसा राहील आजचा दिवस आणि कोणाचा होणार भाग्योदय. प्रेमात कोणाचा होणार वाद आणि कोण करणार रोमान्स. नोकरी आणि व्यापार कामात कोणाला लागणार लॉटरी. कसे राहील आरोग्य आणि कोणाला राहावे लागेल सावध. कोणत्या राशीचे उजळणार भाग्य आणि कोण होणार आज उदास. स्वतःच्या राशीनुसार जाणून घ्या, 9 Sep 2018 च्या संपूर्ण दिवसाची स्थिती रिलिजन दिव्य मराठीवर...

  • Daily Horoscope for 9th september 2018

   मेष
   सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. ज्येष्ठांचे स्वास्थ्य उत्तम राहील. नवोदित कलाकारांच्या गुणांचे कौतुक होईल. तरुणांनी व्यसने टाळावीत.     
   शुभ रंग : नारिंगी, अंक,-२.  

  • Daily Horoscope for 9th september 2018

   वृषभ 
   कौटुंबिक कर्तव्ये व्यवस्थित पार पाडल्याने निश्चिंत असाल. आपल्या एखाद्या आवडत्या छंदास वेळ देता येईल. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच.     
   शुभ रंग: स्ट्रॉबेरी, अंक-९.

  • Daily Horoscope for 9th september 2018

   मिथुन 
   जास्त वेळ आज घराबाहेरच जाईल. एखादा पत्ता शोधण्यासाठी वणवण होऊ शकते. हातचे सोडून पळत्यामागे धावण्याकडे कल राहील. संयम गरजेचा.             
   शुभ रंग : मरुन, अंक-६.

  • Daily Horoscope for 9th september 2018

   कर्क                     
   आर्थिक कोंडीतून सुटका झाल्याने निश्चिंत असाल. सभा-संमेलनात तुमचे वक्तृत्व प्रभावी राहील. हाती घेतलेले कोणतेही काम  निर्विघ्नपणे पार पडेल.           
   शुभ रंग : मोतिया, अंक-३.

  • Daily Horoscope for 9th september 2018

   सिंह
   स्वत:ची विवेकशक्ती वापरा, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. आज विरोधक काढता पाय घेतील. जोडीदाराचे सहकार्य मोलाचे राहील. प्रसन्न दिवस.      
   शुभ रंग : चंदेरी, अंक-३.       

  • Daily Horoscope for 9th september 2018

   कन्या 
   आज दैनंदिन वेळापत्रक बिघडेल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारताना आपली कुवत ओळखा. जमाखर्चाचा मेळ घालणे म्हणजे तारेवरची कसरत होईल.      
   शुभ रंग : गुलाबी, अंक-२.

  • Daily Horoscope for 9th september 2018

   तूळ
   आवक पुरेशी असल्याने चैनी व ऐषआरामी वृत्ती बळावेल. ‘असतील शीते तर जमतील भुते’ याचा अनुभव येईल. गरजूंना आपणहून मदत कराल.         
   शुभ रंग: लाल, अंक,-४.

  • Daily Horoscope for 9th september 2018

   वृश्चिक                   
   नोकरीच्या ठिकाणी कितीही राबलात तरी आज वरिष्ठांचे समाधान होणे कठीण आहे. आज लवकर घर गाठा. परिवारास आपला वेळ देणे गरजेचे आहे.      
   शुभ रंग : पिस्ता, अंक-८.       

  • Daily Horoscope for 9th september 2018

   धनू
   व्यवसायात काही मनाविरुद्ध  घटनांनी नैराश्य जाणवेल. बेकायदेशीर व्यवहार आवर्जून टाळा. प्रामाणिक कष्टास मात्र दैवाची साथ नक्कीच मिळणार आहे.       
   शुभ रंग : क्रीम, अंक-८.

  • Daily Horoscope for 9th september 2018

   मकर
   आज तुम्ही फक्त स्वत:च्या प्रेमात राहा. इतरांच्या भानगडीत लक्ष घालू नका. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. आज ड्रायव्हिंग करताना जपून.          
   शुभ रंग : भगवा, अंक-९.

  • Daily Horoscope for 9th september 2018

   कुंभ
   कौटुंबिक सौख्याचे क्षण अनुभवाल. कार्यक्षेत्रातील वर्चस्व वाढेल.  सकारात्मकता बाळगून आलेल्या प्रयेक संधीचे सोने करता येईल. आशादायी दिवस.        
   शुभ रंग : सोनेरी, अंक-६.

  • Daily Horoscope for 9th september 2018
   Da

   मीन
   नोकरीच्या ठिकाणी आपण बरे की आपले काम बरे या तत्त्वाने वागणे गरजेचे. विरोधक सक्रिय असताना आपले काम बिनचूक करण्यास प्राधान्य द्या.        
   शुभ रंग : आकाशी, अंक-१. 

  Trending