Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Daily horoscope for friday 9th November 2018

राशीफळ : भाऊबीजेच्या मुहूर्तावर जुळून आलाय शोभन योग, पाहा कसा असेल तुमच्या राशीसाठी आजचा दिवस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:00 AM IST

कोणत्या राशीसाठी नेमका कसा असणारा आहे दिवस हे जाणून घेऊयात 12 राशींच्या राशिफळातून.

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    आज कार्तिक शुद्ध द्वितिया म्हणजेच भाऊबीजेचा दिवस. आजच्या दिवशी अनुराधा नक्षत्रामुळे शोभन नावाचा शुभयोग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशींसाठी आजचा दिवस चांगला असेल. कोणत्या राशीसाठी नेमका कसा असणारा आहे दिवस हे जाणून घेऊयात 12 राशींच्या राशिफळातून.

    पुढील स्लाइड्सवर वाचा 12 राशींचे राशीफळ..

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    मेष - आज अनेक सुसंधी तुमचे दार ठोठावतील. आवक ठिकठाक राहील. काही प्रमाणात तत्वांशी तडजोड मात्र करावीच लागणार आहे. आनंदी दिवस.  शुभ रंग : निळा, अंक-४.


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    वृषभ - आज फक्त आपलेच खरे करण्याचा तुमचा हट्ट राहील. आज जोडीदाराचा सल्ला मात्र डावलू नका. पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. शुभ रंग : भगवा, अंक-१.


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    मिथुन - आप्तस्वकीयांसह आजचा दिवस अत्यंत मौजमजेत व्यतीत कराल.आर्थिक आघाडीवर सर्वकाही ठिकठाक राहील. मोठेपणा घेण्यासाठी खर्च कराल. शुभ रंग : मोतिया, अंक-३.


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    कर्क - काही सुखद समाचार येतील सकाळपासूनच तुमचा मूड एकदम प्रसन्न असेल. आज घरात एखादी मौल्यवान खरेदी कराल. गृहसौख्याचा दिवस. शुभ रंग :पिवळा, अंक-९.


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    सिंह - चांगल्या घटनांनी मनाची उमेद वाढेल. परदेशवारीची स्वप्ने पहात असाल तर त्यादृष्टीने अनुकून घटना घडतील. उच्चशिक्षणार्थींच्या महत्वाकांक्षा वाढतील. शुभ रंग: डाळिंबी, अंक-५.


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    कन्या - उद्योग व्यवसायात धनाची वृध्दी होईल. खिसा गरम असल्याने मित्रमंडळींत तुमच्या शब्दाला मान राहील. प्रवासात काही हितसंबंध जुळतील. शुभ रंग :  मोरपंखी, अंक-8.


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    तूळ - मोठया लोकांच्या ओळखी स्वार्थ साधून घेण्यासाठी कामी येतील. कुसंगतीने धनहानी संभवते. उधारी उसनवारीचे व्यवहार आज टाळलेले बरे. शुभ रंग : आकाशी, अंक-३.


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    वृश्चिक - उगीच वाद घालण्यापेक्षा आज संयम व मधुर वाणीने विरोधकांना जिंकता येईल. आज काही भाग्यवान मंडळींना नवीन घराचा ताबा मिळू शकेल. शुभ रंग : सफेद, अंक-७.


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    धनू - नोकरदारांच्या कामगिरीस वरीष्ठ दाद देतील. अधिकारी वर्गाने आपल्या कर्तव्यासही प्राधान्य देणे गरजेचे. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की आहे. शुभ रंग: मोतिया, अंक-2.


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    मकर - सकारात्मक दृष्टीकोन  ठेवाल तर हाती घेतलेले उपक्रम हमखास यशस्वी होतील. अधिकाराचा वापर याेग्य वेळी कराल. जोडीदाराशी सूर जुळतील. शुभ रंग : जांभळा, अंक-६. 


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    कुंभ - एखादी मनाविरुध्द घटना घडल्याने चिडचिड होईल. प्रलोभने गोत्यात आणतील. जोडीदाराचे वर्चस्व मान्य करणे हिताचे राहील. आज कोणतीही रिस्क घेऊ नका. शुभ रंग : क्रिम, अंक-3.


     

  • Daily horoscope for friday 9th November 2018

    मीन - दिवस थोडासा विरोधी राहील. काही प्रमाणात वरीष्ठांशी मतभेद संभवतात. वाढत्या जबाबदारीचा ताण येईल. सुरक्षिततेस महत्व देणे गरजेचे. शुभ रंग : हिरवा, अंक-९.      

Trending