Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Daily horoscope for wednesday 7th November

राशीभविष्य : लक्ष्मीपुजनाच्या आजच्या दिवशी काय सांगताहेत राशी, वाचा आजचे राशीफळ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:00 AM IST

आजच्या दिवशी आपल्या ग्रहांची स्थिती कशी आहे आणि राशी काय सांगतात हे दैनंदिन राशीभविष्यातून आपण जाणून घेणार आहोत.

 • Daily horoscope for wednesday 7th November

  भारतीय परंपरेमध्ये सर्वोच्च स्थान असलेला असा सणांचा राजा म्हणजेच दिवाळीच्या उत्सवातील आजचा सर्वात महत्त्वाचा लक्ष्मीपुजनाचा दिवस आहे. आजच्या दिवशी घरोघरी लक्ष्मी मातेचू पुजा केली जाते आणि जीवनात समृद्धी भरभराटू राहू दे अशी तिच्या चरणी प्रार्थना केली जाते. वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या अशा आजच्या दिवशी आपल्या ग्रहांची स्थिती कशी आहे आणि राशी काय सांगतात हे दैनंदिन राशीभविष्यातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात 12 राशींचे राशिफळ.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, 12 राशींचे राशिफळ..


 • Daily horoscope for wednesday 7th November

  मेष
  पैशाअभावी रखडलेली कामे कार्यान्वित होतील. मित्रपरीवारात मोठेपणा मिळेल. आप्तस्वकीय शब्दास मान देतील. वैवाहीक जीवनात सौख्य व समाधान राहील.     
  शुभ रंग : आकाशी, अंक- ६.  


   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  वृषभ 
  खर्चाचे प्रमाण वाढले असले तरी आर्थिक ओढाताण संभवत नाही. आज आपलेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. दिलेले शब्द पाळावे लागतील.    
  शुभ रंग : मरुन, अंक- ५.


   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  मिथुन 
  समाजिक कार्य करणाऱ्यांना मतभेदांस सामोरे जावे लागेल. दानधर्म करताना आधी शिल्लक तपासा. स्वत:चा स्वार्थ साधून घेणे जास्त गरजेचे आहे.             
  शुभ रंग : गुलाबी, अंक-७. 


   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  कर्क                     
  मित्रमंडळींवर आज तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक राहील. व्यावसायात आज अपेक्षेपेक्षा जास्तच नफा होईल.       
  शुभ रंग : निळा, अंक-४.


   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  सिंह
  लेखक, कवी, पत्रकार मंडळींच्या कामाचे कौतुक होईल. आज इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यची उमेद निर्माण होईल. प्रामाणिक मेहनतीस न्याय मिळेल.      
  शुभ रंग : राखाडी, अंक-३. 


   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  कन्या 
  आर्थिक स्तर उंचावेल. मनात येणाऱ्या सर्व गोष्टी पूर्णत्वास जातील. मुलांच्या समजुतीने घेवून त्यांचे हट्ट स्वखुशीने पुरवाल. गरजूंना मदत कराल. 
  शुभ रंग : पिस्ता, अंक- ८.         


   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  तूळ
  आत्मविश्वासाने केलेली कामे शंभर टक्के यशस्वी होतील. आज जोडीदाराच्या आवडीनिवडी कडे विशेष लक्ष द्याल. लक्ष्मी मातेची कृपादृष्टी राहील.      
  शुभ रंग : अबोली, अंक, -५

   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  वृश्चिक
  कलाकारांचा परदेशातही गौरव होईल. भविष्याच्या दृष्टीने आज एखादी गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्याल. घरात वृध्दांची मने सांभाळावी लागतील.
  शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक, -२


   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  धनू
  आर्थिक बाजू थोडी कमजोर असली तरी पूर्वीची येणी वसूल होण्याची शक्यता आहे. आज थोडे व्यवहारी रहा व झेपतील त्याच जबाबदाऱ्या स्विकारा.
  शुभ रंग : सफेद, अंक-१.


   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  मकर
  आर्थिक विवंचना मिटतील. आज प्रिय व्यक्तीच्या लहरी सांभाळाव्या लागतील. उच्चशिक्षितांना लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या चालून येतील. आनंदी दिवस.       
  शुभ रंग : चंदेरी, अंक-९.       


   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  कुंभ
  दैनंदीन व्यवहार सुरळीत पार पडतील. जोडीदारासह आज जुन्या आठवणींना उजाळा द्याल. मुले पालकांच्या आज्ञेत असतील. गृहसौख्याचा दिवस.  
  शुभ रंग: मोरपंखी, अंक- १.


   

 • Daily horoscope for wednesday 7th November

  मीन
  एकावर विसंबून दूसऱ्यास शब्द देवू नका. कार्यक्षेत्रात स्वावलंबन महत्वाचे राहील. महत्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई मुळीच करु नका.     
  शुभ रंग: पांढरा, अंक-५.

Trending