आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Daily Horoscope: Friday 13 December 2019 Daily Horoscope In Marathi

जाणून घ्या आपल्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस

8 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी दिवसाची सुरुवात आर्द्रा नक्षत्रामध्ये होत आहे. आज ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून एक शुभ योग जुळून येत आहे. याचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होणार आहे. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस
मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ६ मोठे आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. मनाजोगत्या घटना घडल्याने मानसिक प्रसन्नता राहील. मित्रमंळींचे सहकार्य मोलाचे राहील. आज काही प्रलोभने आकर्षित करतील.
वृषभ: शुभ रंग : आकाशी | अंक : १ कार्यक्षेत्रात वरीष्ठंवर तसेच सहकारी वर्गावर तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. आज भावनांच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. मित्रांना दूर ठेवा.
मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४ बेकायदेशीर कृत्यातून त्रास संभवतो. नाकासमोर चालणेच हिताचे राहील. वडीलधाऱ्यांच्या आज्ञेत रहा. नोकरीधंद्याच्या दृष्टीने दिवस अनुकूल नाही.
कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ९ जे चालंलंय ते बरं चालंलंय. मोहापसून दूूर रहा.प्रतिष्ठेस जपणे गरजेचे आहे. वाहन सुरक्षित चालवा. विवाह जुळवण्या विषयी बोलणी उद्यावर ढकला.
सिंह : शुभ रंग : तांबूस | अंक : १ वैवाहीक जिवनांत आनंद द्विगुणीत करणारी घटना घडेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. नाती जपण्यासाठी खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणे हिताचे राहील.
कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ८ नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल.आज तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. मुलांकडून आज काही सुवार्ता येणार आहेत.
तूळ : शुभ रंग : निळा| अंक : ७ कितीही व्यस्त असलात तरी वेळात वेळ काढून आज एखाद्या करमणूकीच्या कार्यक्रमाचा आसवाद घ्याल. आज अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल राहील.
वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ४ परिवारात काही आनंदी घटनांनी खेळीमेळीचे वातावरण राहील. अनेक दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावणे तुमच्या हाती आहे. खेळाडूंनी सराव वाढवावा.
धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ५ लेखन, पुस्तक प्रकाशन तसेच जाहिरातीच्या क्षेत्रात अनुकूलता राहील. साहित्यिक, कवी यांना वाचकवर्ग मिळेल. कोणतेही गैरव्यवहार मात्र टाळायला हवेत.
मकर : शुभ रंग : मोतिया | अंक : ९ आनंदी व उत्साही दिवस. खिशात पैसा खेळता राहील.काही नवे हितसंबंध जुळतील. आज वाणीवर मात्र लगाम असणे अत्यंत गरजेचे राहील. शेजारी वाद शक्य.
कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६ स्वभावातील लहरीपणास आवर घालून संयमाने वागणे गरजेचे आहे. स्पर्धकांवर मात करण्यासाठी अविश्रांत परिश्रम अवश्यक आहेत. जोडीदार समजूतीने घेईल.
मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३ समाज हिताची कामे करणाऱ्यांना लोकप्रियता मिळेल. योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे यशाकडे तुमची वाटचाल चालू राहील. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल.