आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 13 मार्च रोजी दिवसाची सुरुवात स्वाती नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावाने आजच्या दिवशी व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 9 राशीच्या लोकांनी सावध राहणेच उत्तम आहे. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : १
अती धावपळ टाळा. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. आज जोडीदाराने दिलेले सल्लेही मोलाचे असतील.

वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७
अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उच्चशिक्षणार्थींच्या अपेक्षा वाढतील. नवीन विषयात गोडी निर्माण होईल.

मिथुन : शुभ रंग : सोनेरी | अंक : २
आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात रहा.

सिंह : शुभ रंग : क्रिम | अंक : ४
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.

कन्या : शुभ रंग : चंदेरी | अंक : ८
नोकरीच्या ठीकाणी फक्त बिनचूक काम करण्यावर भर द्या. वरीष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अध्यात्मिक मार्गाकडे पावले वळतील.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेऊ नका. काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे. कामापुरतेच बोला.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरीष्ठांचे समाधान अशक्य.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

मकर : शुभ रंग : निळा | अंक : ६
कर्तव्या पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. आज तुम्ही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९
स्थावरासंबंधीत अपूरे व्यवहार मार्गी लागतील. वास्तू व वाहन खरेदीसठी कर्जमंजूरी होईल. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. अाज म्हणाल ती पूर्व.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ५
व्यवसायात जाहीरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्व गुंडाळून ठेवावी लागतील. आज काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज.

बातम्या आणखी आहेत...