आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क

Feb 14,2020 12:00:00 AM IST

शुक्रवार, 14 फेब्रुवारी रोजी दिवसाची सुरुवात चित्रा नक्षत्रामध्ये होत आहे. राहू काळ सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. दिशा शूल-पश्चिमेस राहील. एकूणच ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावाने आज 12 पैकी 8 राशींसाठी दिवस चांगला, तर उर्वरीत राशींसाठी संमिश्र स्वरुपाचा ठरेल.

  • मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : ३ - ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.
  • वृषभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : २ - आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.
  • मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : १ - घरात शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.नवे कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.
  • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ५ - आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.
  • सिंह : शुभ रंग : जांभळा | अंक : ४ - नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदीन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.
  • कन्या : शुभ रंग :मोतिया| अंक : ७ - आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.
  • तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ६ - वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता जाणवणार नाही. व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. पत्नीची भक्कम साथ राहील.
  • वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९ - कंजूषपणा काही कामाचा नाही. अत्यावश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही कर्ज हप्ते फेडावे लागतील. प्रवास होतील. डोळ्यांची निगा राखा.
  • धनू : शुभ रंग : भगवा | अंक : १ - जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहीक जिवनात गोडवा राहील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून सुवार्ता.
  • मकर : शुभ रंग : लाल | अंक : ८ - नोकरदारांना ओव्हर टईम करावा लागणार आहे.वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.
  • कुंभ : शुभ रंग : अबोली | अंक : ६ - नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावर ढकलेली बरी.शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.
  • मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ - नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.
X