आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

आज शुक्रवार, 6 मार्च रोजी दिवसाची सुरुवात पुनर्वसू नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे आजच्या दिवशी शोभन आणि सौभाग्य नावाचे योग जुळून येत आहेत. हा योग 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी चांगला ठरू शकतो. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.

मेष: शुभ रंग : केशरी | अंक : १
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.

वृषभ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८
दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल.

मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : ५
आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असले तरी पुरेसा पैसाही उपलब्ध होणार आहे. दूरावलेल्या नात्यांतील काही गैरसमज दूर होतील.


कर्क :  शुभ रंग : निळा | अंक
: ७
आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी  खर्च कराल.आज उच्च राहणीमानाकडे तुमचा कल राहील. एखादी हरवलेली वस्तू  दुपारनंतर परत शोधा सापडेल.


सिंह : शुभ रंग : डाळिंबी  | अंक
: ९
सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते.


कन्या : शुभ रंग : पिस्ता  | अंक
: ७
नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल.

तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : ३
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत.

वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ६
नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची मते विचारात घेणे गरजेचे आहे.


धनू :  शुभ रंग : सोनेरी | अंक
: ४
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेणे हिताचे.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : २
आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. सहकुटुंब चैन व करमणूकीस प्राधान्य द्याल. संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलाकार व खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील.

बातम्या आणखी आहेत...