आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Daily Horoscope: Thursday 6 February 2020 Daily Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, तुमच्या राशिसाठी कसा राहील आजचा गुरुवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक

गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी दिवसाची सुरुवात शुभ मुहूर्तामध्ये होत आहे. आजच्या दिवशी आर्द्रा नक्षत्र आणि ग्रह स्थितीमुळे 12 पैकी 8 राशिच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. काहींच्या बाबतींत आज कामे काही प्रमाणात रखडले जाण्याची शक्यता आहे. उर्वरीत राशिच्या लोकांसाठी दिवस संमिश्र राहील.

 • मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ - कार्यालयीन कामासाठी जवळपासचे प्रवास करावे लगतील. बरेच दिवसापासून तुम्हाला अपेक्षित असलेली मेल्स येतील. शेजारी घरात आपुलकीने डोकावतील.
 • वृषभ : शुभ रंग : केशरी | अंक : ६ - उद्योगधंद्यातील काही येणी आकस्मिकरीत्या वसूल झाल्याने तुमची मनस्थिती चांगली असेल. आज महत्वाच्या चर्चेत स्वत:च्या मतावर ठाम रहाल.
 • मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ८ - आज प्रकृती उत्तम साथ देईल. दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. समोरील व्यक्तीवर तुमचा प्रभाव राहील. तरीही आज तुमचे मन काहीसे चंचल राहील.
 • कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : २ - व्यवसायात ठरलेली उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. काही देणीही चुकवावी लागणार आहेत. कर्जप्रस्ताव रखडतील.
 • सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : १ - आज तुमचे मनोबल उत्तम राहील. काही अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. आप्तस्वकीयात मान मिळेल. सार्वजनिक कामात तुमचा सहभाग राहील.
 • कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : २ - आज तुम्ही कर्तव्यास प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात कामाच्या प्रचंड व्यापामुळे महत्वाच्या घरगुती प्रश्नांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. हक्क गाजवाल.
 • तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ४ - आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका. आज देव गाऱ्हाणे ऐकेल.
 • वृश्चिक : शुभ रंग : मरून | अंक : ७- आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत. सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा करु नका.
 • धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : ५ - आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.
 • मकर : शुभ रंग : तांबडा | अंक : ६ - कष्टांचाही अतिरेक करू नका. ध्येयाच्या मागे धावताना तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या. आज व्यस्त दिवस.
 • कुंभ : शुभ रंग : सफेद | अंक : ४ - प्रतिष्ठीतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.
 • मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ - प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कुटुंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील.