Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | daily hosroscope 14 april 2019 in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 12:00 AM IST

12 पैकी 3 राशींसाठी आजचा दिवस खास आहे

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi
  आजच्या दिवशी राहू काळ सायंकाळी 4.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. दिशा शूल पश्चिमेस राहील. आजचा दिवस एकूणच 12 पैकी 3 राशींसाठी खास राहील. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिस सामान्य ठरेल.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  मेष : शुभरंग: मोरपंखी| अंक:८
  आज जमेची बाजू जड राहील. घर सजावटीसाठी मौल्यवान चीजवस्तूंची खरेदी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  वृषभ: शुभरंग: नारिंगी| अंक:५
  कौटुंबिक अडणींवर मात करण्यासाठी जोडीदाराची साथ मोलाची राहील. कार्यालयीन कामासाठी आज काही जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  मिथुन: शुभ रंग : आकाशी| अंक:७
  रखडलेले उपक्रम सुरु करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. नव्याने चालून आलेल्या संधींचे सोने कराल.ग़हीणींना आज काटकसर करण्याची अवश्यकता नाही.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  कर्क:  शुभ रंग : पांढरा| अंक : ९
  भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकू शकतात. आजच झालेल्या नव्या ओळखींवर चुकूनही विश्वास ठेऊ नका. वडीलधाऱ्यांचे सल्ले आज दुर्लक्षित करू नका.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६ 
  हाती असलेला पैसा जपून वापरणे गरजेचे. आज काही मोठे खर्च दार ठोठावतील. रात्रीच्या प्रवसात जागेच राहीलेले बरे. आज तुम्ही काही गरजूंच्या कामी याल.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
  बऱ्याच दिवसांपासूनची काही अपूरी स्वप्ने साकार होऊ शकतील. कर्जप्रस्ताव मंजूर होतील. आज शुभ चिंता, जे मागाल त्याला देव तथास्तू म्हणणार आहे.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  तूळ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४
  जिवलग मित्रांमधेही आज काही वैचारीक मतभेद होणार आहेत. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येणार आहे. स्वावलंबनास प्राधान्य देणे गरजेचे आहे. 

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ७
  सहजच काही साध्य होईल या भ्रमात राहू नका. सरकारी कामात विलंब ठरलेलाच आहे. घरात वडीलधाऱ्यांचेही मूड सांभाळावे लागणार आहेत.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  धनू :  शुभ रंग : केशरी | अंक : ८
  आज घरात व बाहेर कुठेही आपलेच खरे करण्याचा अट्टहास टाळा. वैवाहीक जिवनांत चालंलंय ते बरं चालंलंय. जोडीदाराच्या चुका काढण्याचा प्रयत्न नको.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
  अत्यंत उत्साही व आनंदी दिवस. तुमच्या महत्वाकांक्षा व अपेक्षाही वाढतील. आज एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. गृहलक्ष्मी हसतमुख राहील.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  कुंभ : शुभ रंग : मरून  | अंक : २
  नोकरीच्या ठीकाणी कामाचा ताण जाणवेल. जर वरीष्ठांच्या मर्जीत रहायचे असेल तर अतिरीक्त जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. दिवस कष्टांचा.

 • daily hosroscope 14 april 2019 in marathi

  मीन : शुभ रंग : जांभळा  | अंक : १
  आपल्या कार्यक्षेत्रात आघाडीवर रहाल. आज तुमचा अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. मुलांचे हट्ट हौसेने पुरवाल. ज्येष्ठांना प्रकृती उत्तम साथ देईल.

Trending