आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनंदिन कामामध्ये होणारा संसर्ग या गोष्टीमुळे सहज टाळता येऊ शकतो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रोगाचा प्रदुर्भाव होण्यास मुख्य घटक म्हणजे जंतू. बहुतेक रोग त्याच्या संसर्गामुळे पसरतात. आपण दररोज बऱ्याच गोष्टींना स्पर्श करतो. केव्हा, कधी, कसे आणि कोणते जंतू हाताला लागतील हे कळत नाही. त्यामुळे आपण अशा काही जंतूंबद्दल जाणून घेऊ ज्यापासून रोज संसर्ग होण्याची भीती असते त्यांना कसे टाळायचे याबद्दल पाहू...

  • मोबाइल फोन

यात मेथिसिलिन प्रतिरोधक स्टेफिलोकोस ऑरियस (एमआरएसए) नावाचे बॅक्टेरिया असतात. अॅरिझोना विद्यापाठात केलेल्या संशोधनात एमआरएसए बॅक्टेरिया २५ पैकी २० मोबाइलवर आढळले. तरीदेखील बरेच लोक फोन हातात घेऊ जेवण करत असतात.

कसे टाळाल : हे टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा अापला फोन निर्जंतुकीकरण वाइप्सने साफ करा. यामुळे फोनच्या वरच्या भागामधील जंतूचा नाश होतो.

  • शाॅवर

हे जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल. मात्र खरं आहे, शॉवरमुळे आपल्याला अनेक प्रकारचे जंतू दूषित करू शकतात. मॅथालोबक्टर आणि स्फिंगोमोनस सारखे जंतू शॉवरमध्ये वाढतात. शॉवरच्या बाजूला आणि बाथरूमच्या पडद्यामध्ये ते सर्वाधिक वाढतात.

कसे टाळाल : स्नानगृह स्वच्छ करताना शॉवरचीही स्वच्छता करायला हवी. डेटॉलच्या पाण्याने धुवायला हवे. तसेच बाथरूममध्ये प्लास्टिकचे पडदे अजिबात वापरू नका.

  • विमान प्रवास

विमान प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये अनेकदा नोरोव्हायरस आढळून आला. संशोधनानुसार, अनेक लोकांना प्रदीर्घ हवाई प्रवासादरम्यान नोरोव्हायरसमुळे अतिसाराचा त्रास झाल्याचे दिसून आहे.हे टाळण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती असणे गरजेचे आहे.

कसे टाळाल :हवाई प्रवासात मिळालेल्या फूड पॅकेटवर देखील अनेकदा नाेरोव्हायरसचा धोका असतो. अनेकदा असे प्रकरण समोर आले. ते फूड पॅकेट घेताना साफ करून घ्यावे.

  • रुग्णालय

अतिसार होण्याचे मुख्य कारण दवाखान्यातील क्लोसट्रिडियम डिफिसायल आहे. त्याला सीडीफ पण म्हणतात. ते निरोगी शरीरात गेल्यानंतर सुरुवातीला काहीच होत नाही मात्र अॅंटिबायोटिक घेतल्यानंतर ते शरीरावर परिणाम करतात.

कसे टाळाल : आपल्याला एका दिवसापेक्षा जास्त दिवस दवाखान्यात जावे लागत असेल तर यादरम्यान दही खा. यात अॅसिडोफिल्स नावाचा बॅक्टेरिया असतो,जे सीडीफ नष्ट करतो

बातम्या आणखी आहेत...