Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Daily water supply in five areas of city from today

आजपासून काही भागात रोज पाणी, आयुक्तांचा आराखडा

प्रतिनिधी | Update - Aug 09, 2018, 11:42 AM IST

उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करीत सोलापुरातील काही भागांना रोज पाणीपुरवठा करण्याचे सुनियाेजित धोरण कार्यान्वित करण्याच्य

 • Daily water supply in five areas of city from today

  सोलापूर- उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करीत सोलापुरातील काही भागांना रोज पाणीपुरवठा करण्याचे सुनियाेजित धोरण कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने महापालिका अायुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आराखडा तयार केला आहे. अर्थात पहिल्या टप्प्यात काही भागात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू झाली. टप्प्याटप्प्याने शक्य त्या भागात रोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असेल असे श्री. ढाकणे यांनी सांगितले.


  उपलब्ध पाणी, त्या त्या भागातील पाण्याच्या टाक्या यांची क्षमता व वितरण यंत्रणा यांचे नियोजन आखण्यात आले आहे. तीन दिवसांतून ६०० लिटर पाणी देण्यापेक्षा रोज दोनशे लिटर पाणी दिले गेले तर पाण्याचा अपव्ययही होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांना पाणी वाचवण्याची सवयही लागेल. सध्या पाणीपुरवठ्याच्या दिवशी घरात साठवलेले संपूर्ण पाणी टाकून नव्याने पाणी भरले जाते. यामुळे जर रोज पाणी दिले गेले तर पाणी बचतही होईल. महापालिका पाणीपुरवठ्याच्या वेळा काटेकोर पाळणार आहे, यासाठी उपलब्ध यंत्रणा नियोजन करीत आहे, असेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.


  १५ अॉगस्टपासून घरकुलमध्ये सुरू होणार महापालिकेचा दवाखाना
  विडी घरकुलसाठी महापालिकेचा नवा दवाखाना १५ ऑगस्टपासून सुरू होईल. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, याचा आढावा आयुक्त डॉ. ढाकणे यांनी घेतला. उपचारासाठी आवश्यक औषधे घेणे गरजेचे असल्याने त्याबाबतचा निर्णय आयुक्तांनी घेतला. हा विषय मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर येणार होता. सभा तहकूब झाली. मात्र अत्यावश्यक बाब म्हणून हा निर्णय झाला.


  शिवगंगानगर येथील रिक्षा स्टॉप संघटनेचे निवेदन
  मराठा वस्ती, भवानी पेठ येथील शिवगंगानगर चौकात अतिक्रमण झाले आहे. चायनीज गाड्या, अंडा आॅम्लेट गाड्या, पान टपरी, त्या अनुषंगाने मटका हा गैरप्रकार होत असल्याने कारवाई करण्याबाबतचे निवेदन शिवगंगा रिक्षा स्टॉपच्या वतीने अध्यक्ष बसवराज गुब्याडकर, उपाध्यक्ष शिवा कणके, सचिव रेवण चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिले. रस्त्यावरील चार चाकी गाड्यांच्या अतिक्रमणाचा विषय लक्षात घेत याबाबत तत्काळ कारवाई होईल, असे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

Trending