आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेच्या स्थळावरून एकमत हाेईना; दाेन पदाधिकाऱ्यांमध्ये वादळी चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- यंदा हाेणाऱ्या जिल्हा परिषद आणि त्यानंतर हाेऊ घातलेल्या लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसने भाजप सरकारला काेंडीत पकडण्यास सुरुवात केली असून, काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा जिल्ह्यात धडकणार अाहे. या यात्रेच्या तयारीसाठी रविवारी झालेल्या बैठकीतच पक्षाअंतर्गत संघर्षाची चुणूक पाहायला मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. या यात्रेअंतर्गत प्रदेशाध्यक्ष खा. अशाेक चव्हाण यांची सभा अकोल्यात हाेणार असून, सभेच्या स्थळावरून वादळी चर्चा झाल्याचा दावा सूत्रांनी केला अाहे. मात्र या सभेच्या स्थळावर एकमत झालेच नाही. अखेर स्थळाबाबतचा निर्णय पक्ष निरीक्षकांवर सोपवण्यात अाला. अशातच एक पदाधिकारी व नगरसेवकामध्ये वादळी चर्चा झाल्याचे सूत्रांचे मत अाहे. बैठकीत यात्रेसाठी विविध समित्यांवर चर्चा करण्यात अाली. 

 

जिल्ह्यात दाेन पेक्षा जास्त दशकांपासून राजकीय वनवास भाेगणाऱ्या काँग्रेसने हाेऊ घातलेल्या निवडणुकांमधील कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु अाहेत. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने सुरू केलेली राज्यव्यापी जन संघर्ष यात्रा ४ ते ९ डिसेंबर या कालावधीत पश्चिम विदर्भात येणार अाहे. या यात्रेअंतर्गत अकाेला जिल्ह्यात ६ ते ८ असे तीन दिवस कार्यक्रम हाेणार अाहेत. 

 

अशी रंगली चर्चा : 
जनसंघर्ष यात्रेअंतर्गत हाेणाऱ्या सभेचे स्थळ निश्चित करण्यासाठी बैठकीत काहींनी सूचना, मतं व्यक्त केली. अल्पसंख्यांक समाज हा काँग्रेसची व्हाेटबँक म्हणून अाेळखला जाताे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही सभा गाैरक्षण राेडसारख्या हिंदूबहुल भागात घेण्याचा अाग्रह अल्पसंख्यांक समाजाच्या नेत्यांनी केला. मात्र काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सभा फतेह चाैक परिसरात घेण्याची सूचना केल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. फतेह चाैक परिसर हा अल्पसंख्यांकबहुल अाहे. तसेच या परिसरात बाजारपेठही अाहे. दरम्यान याबाबत महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी यांच्याशी संपर्क साधला असता सभेच्या स्थळाबाबत काहींनी सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सभेच्या स्थळाबाबतचा निर्णय निरीक्षक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

अशा झाल्या दाेन बैठका : 

संघर्ष यात्रेदरम्यान शनिवारी स्वराज्य भवन येथे ग्रामीणच्या नियोजनाची बैठक झाली. त्यानंतर रविवारी पुन्हा बैठक झाली. बैठकीला निरीक्षक रामकृष्ण अाेझा, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी, माजी अामदार लक्ष्मणराव तायडे, नातिकोद्दीन खतीब, प्रदेश महासचिव मदन भरगड, नगरसेवक साजिद खान पठाण, महेमूद खान, प्रदीप वखारीया, अजहर इकबाल, माे. इरफान, सिमा ठाकरे, कपिल रावदेव, विभा राऊत , महेंद्र गवई, हेमंत देशमुख, डाॅ. सुभाष काेरपे, संजय बाेडखे, प्रदेश प्रवक्ते डाॅ. सुधीर ढाेणे, प्रशांत पाचडे, प्रमाेद डाेंगरे, राम चंदनगिरी, अनंत बगाडे, अादी उपस्थित हाेते. याबाबत रविवारी झालेल्या बैठकीला उपाध्यक्ष राजेश भारती, महासचिव प्रकाश तायडे, जि.प.सदस्य बाळासाहेब बाेंद्रे अादी उपस्थित हाेते. 

अशी राहिल यात्रा : यात्रेचे ६ डिसेंबर रोजी दुपारी मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे स्वागत होणार आहे. त्यानंतर दाेनवडा, शिरसाे, मूर्तिजापूर येथे अागमन हाेणार अाहे. त्यानंतर यात्रा कारंजाकडे रवाना हाेणार अाहे. शुक्रवारी ७ डिसेंबर रोजी पातूर येथे अागमन हाेणार अाहे. त्यानंतर अकाेल्यात सभा हाेणार अाहे. नंतर यात्रा व्याळा, बाळापूरकडे जाणार अाहे. शनिवारी ८ डिसेंबर राेजी सकाळी निंबा येथे यात्रेचे अागमन हाेणार अाहे. त्यानंतर अाडसूळ, देवरी फाटा, अकाेट येथे यात्रा जाणार अाहे. अकाेट येथे रॅली व सभा हाेणार अाहे. त्यानंतर हिरवरखेड तेल्हारा, वरवट बकालकडे यात्रा रवाना हाेणार अाहे. 

 

थोडक्यात निपटले; सभा शांततेत झाल्याचा दावा 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठक एक नगरसेवक आणि नगरसेविका पतीमध्ये वादळी चर्चा झाली. पूर्व राजकीय वैमनस्यातून या चर्चेला प्रारंभ झाल्याचे समजते. परिणामी सभागृहात तणाव सदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. मात्र सभा शांततेने पार पडली, असा दावा महानराध्यक्षांनी केला अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...