आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय आवटे यांना दीनमित्रकार पत्रकारिता पुरस्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैनिक दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे - Divya Marathi
दैनिक दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे

कुकाणे : नेवासे तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांना, तर साहित्य पुरस्कार डाॅ. अरुण शिंदे (कोल्हापूर), सु. द. घाटे (कंधार, नांदेड), धम्मज्योती कांबळे (अकोला), बी. आर. भोसले (पंढरपूर), रमेश बुरबुरे (यवतमाळ) व आनंदा साळवे (नगर) यांना जाहीर झाले.

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व सचिव उत्तमराव पाटील यांनी रविवारी स्मारक समितीच्या सभागृहात या पुरस्कारांची घोषणा केली. डॉ. शिंदे यांच्या 'सत्यशोधक नियतकालिके' या संशोधन ग्रंथास, घाटे यांच्या 'रूमणपेच' या कथासंग्रहास, कांबळे यांच्या 'करपलेले कोंब' या कांदबरीस, भोसले यांच्या 'पेनाच्या टोकावर' या वैचारिक ग्रंथास, बुरबुरे यांच्या 'अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ' या काव्यास, तर साळवे यांच्या 'लपंडाव' या काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरोगामी व परिवर्तनपर साहित्यास १९९५ पासून हे पुरस्कार दिले जातात. २२ डिसेंबरला दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयाच्या प्रांगणात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबा आरगडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...